Thursday, 11 November 2021

रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम यांनी कल्याण आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा !!

रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम यांनी कल्याण आगारातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा !!


कल्याण, बातमीदार : एसटी कर्मचाऱयांचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱयांनी 27 ऑक्टोबरपासून आंदोलन छेडले आहे. आधी शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता व उर्वरित मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर संप मागे घेतला जाईल अशी अपेक्षा होती; परंतु कर्मचाऱयांनी 'अभी नही तो कभी नही' अशी भूमिका घेत मागणी मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांसाठी सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. मात्र संप मागे घेण्याच्या अनेक विनवण्या करूनही कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. 

महाराष्ट्रात जवळपास 40 कर्मचाऱ्यांचे आत्तापर्यंत  आत्महत्या केल्या आहेत एसटी कर्मचारी व कामगार वर्ग यांना एकजुटीचा नारा देत मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनास सुरुवात केली आहे .या आंदोलनात कामगारांचे मुला बाळा सहित कामगार आंदोलनाला बसले आहेत.

एसटी कामगारांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चाही केली. 

कल्याण बस आगारातील बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनास प्रत्यक्ष भेटून रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. निर्मला ताई कदम, कल्याण अध्यक्ष संध्याताई निकम, उपाध्यक्ष मीनाताई वाघ, सन्माननीय भारती बुटाला ताई, नाभिक महामंडळाचे मा. आबासाहेब बिरारी यांनी आंदोलनाला नाभिक महामंडळातर्फे जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ .निर्मला ताई कदम यांनी सरकारला धारेवर धरले आहे. तसेच रयत क्रांती संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्राची तोफ आदरणीय सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार जोपर्यंत कामगारांचा प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत रहाणार नाही असे सांगितले.



No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...