भिवंडीत 21 लाखाचा गुटक्यासह वाहन जप्त, चालकाला अटक.!!
भिवंडी, दिं,11, अरुण पाटील (कोपर) :
राज्यात तंबाखूजन्य व सुगंधी पदार्थ तसेच गुटका विक्रीस बंदी असताना देखील भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात गुजरात राज्याच्यातून येणारा गुटका व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असून अश्याच प्रकारे भिवंडी तालुक्यातील गोडाऊन मध्ये प्रतिबंधित गुटका साठवणूक करून तो विविध वाहनातून ठाणे, मुंबई, कल्याण, वाशी, पनवेल अशा विविध शहरात व ग्रामीण भागात पाठविला जात असून या गुटक्याची माहिती ही प्रत्येक पोलीस स्टेशन मधील वसुली करणारा (कलेक्टर) पोलीस कर्मचाऱ्यांला व अन्न व औषध प्रशासनाला माहिती असताना देखील हे चिरी मिरी घेऊन कारवाई केली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांन कडून बोलले जात आहे. मुख्यबाब म्हणजे हा गुजरात राज्यातून आलेला प्रतिबंधित गुटका हा तालूक्यात प्रत्येक पान टपरीवर खुलेआम चढ्या भावाने विक्री केला जात आहे.
अशाच प्रकारे भिवंडी तालुक्यातील पिंपळास गांव परिसरात असलेल्या एका गोडाऊन मधून लाखो रुपये किमतीचा प्रतिबंधक असलेला केसरयुक्त गुटखा विक्री साठी अन्य शहरात आयशर टेंपो मधून जात असल्याची माहिती कोनगांव पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी तात्काळ विशेष पोलीस पथकासह सापळा रचून आयशर टेम्पो अडवून त्यातून सुमारे 21 लाख 85 हजार 920 रुपये किमंतीचा अवैध गुटक्याचे 47 पोती व टेंपो जप्त केला असुन असा ऐकुन सुमारे 29 लाख 85 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून टेंपो चालकास अटक केली आहे.
महादेव भोसले (42 रा. खटाव. सातारा) गेल्या काही दिवसापासून शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटका हा भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री साठी विक्रीसाठी येत आहे. भिवंडी कल्याण महा मार्गावरील पिंपळास गांव जवळील आर.के.जी गोदामातून केसरयुक्त प्रिमियर नजर – 9000 गुटका भिवंडीतून अन्य शहरात एका टेंपोतून विक्रीसाठी जातअसल्याची माहिती पोलीसांना मिळताच कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी माणिक आबोसे, एस.राठोड, आर. बोडके यांना सोबत घेऊन विशेष पोलीस पथकासह गोदामाचा बाहेर सापळा रचून टेम्पो रस्त्यावर अडवून झडती घेऊन वरील कारवाई केली असून या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पराग भाट करीत आहेत.

No comments:
Post a Comment