Sunday, 14 November 2021

चंडिका क्रिकेट संघ, केरे ठरला "प्रथम क्रमांकाचा" मानकरी !!

चंडिका क्रिकेट संघ, केरे ठरला "प्रथम क्रमांकाचा" मानकरी !!


मुंबई, ( दिपक कारकर ) :

मुंबईत चर्चगेटच्या ओव्हल मैदानात नुकतीच रविवार दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी, ८८ चषक २०२१ उपरोक्त मंडळातर्फे आयोजित एकदिवसीय भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पार पडली. पंचक्रोशी/ गाव/ वाडी मर्यादित गटातील या स्पर्धेत तब्बल ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या चिपळूण तालुक्यातील केरे गावच्या चंडिका क्रिकेट संघाला घवघवीत यश मिळालं. उत्तम खेळाचं प्रदर्शन करून या स्पर्धेत बाजी मारली. चंडिका संघाकडून उत्कृष्ट गोलंदाज एकनाथ केंबळे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेश भुवड यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व संघाला रोख रक्कम सहित आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. चंडिका क्रिकेट संघाच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल पंचक्रोशीतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिनाची पूर्व संध्या....नमन लोककलेचा त्रिवेणी संगम !!

प्रजासत्ताक दिनाची पूर्व संध्या....नमन लोककलेचा त्रिवेणी संगम !! मुंबई प्रतिनीधी( दिपक वेलुंडे)        रविवार २५ जानेवारी, २०२६ ...