Sunday, 14 November 2021

कोकण सुपूत्र गणपत ( दादा ) घडशी यांचा पुण्यात "आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे - २०२१" पुरस्काराने सन्मान !!

कोकण सुपूत्र गणपत ( दादा ) घडशी यांचा पुण्यात "आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे - २०२१" पुरस्काराने सन्मान !!


मुंबई - ( दिपक कारकर ) :

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग ( महाराष्ट्र शासन ) अंतर्गत आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार २०२१ या पुरस्काराचे त्यांच्या जयंती निमित्त पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात वितरण झाले. या सोहळ्यात कोकण सुपूत्र गणपत घडशी यांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यासाठी आलेल्या गणपत दादांनी पुणे सारख्या शहरात अनेक कोकणी बांधवांना एकत्रित करत सह्याद्री कुणबी संघाची स्थापना केली. या संस्थेची वाटचाल १५ वर्षे हुन अधिक यशस्वीपणे वृद्धिंगत होत चालली असून अनेक उपक्रम संस्था वर्षभरात घेते. या संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून दादांनी आजवर योगदान दिले आहे. शिवाय लांजा तालुक्यातील त्यांची नुकतीच कुरणे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचं ग्रामिण-पुणे शहरात सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे.त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर व विभागीय शाखा यांसतर्फे त्यांस अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...