Sunday, 14 November 2021

ठाणे महानगरपालिका कठोर निर्णय घेण्याची शक्यता !! "लस नाही तर बसमध्ये प्रवेश नाही

ठाणे महानगरपालिका कठोर निर्णय घेण्याची शक्यता !!
"लस नाही तर बसमध्ये प्रवेश नाही"


ठाणे, बातमीदार : तुम्ही जर अजूनही लस घेतली नसेल किंवा घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल तर सावधान. तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचे कारण म्हणजे आता लसीचा डोस न घेतलेल्यांच्या प्रवाशांवर गदा येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने ‘हर घर दत्तक ’उपक्रम हाती घेतला आहे. त्यापाठोपाठ आता लशीची एकही मात्रा घेतलेली नाही अशा नागरिकांना टीएमटीच्या बसमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असा सक्तीचा निर्णय पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने घेतला आहे.  .

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...