Sunday, 14 November 2021

कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. !!

कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : केंद्र शासनाने व राज्य शासनाने तृतीय पंथीयांना समानतेचा हक्क दिला असला तरी आजही समाजात तृतीय पंथी याची अहवेलना होतं आहे. तृतीय पंथीयांची जनगणनेत नोंद व्हावी व त्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी या साठी शासना कडून तृतुय पंथीयांची मतदार नोदणी करण्यात येत आहे. कल्याण मध्ये निवडणूक आयोगाने किन्नर अस्मिता या तृतीय पंथीयांच्या संस्थेच्या माध्यमातून तृतीय पंथीयांसाठी मतदार नोदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन केले होते तृतीय पंथीयांचा मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद दिला १०० च्या वर यात नोदणी झाली आहे.


मतदार यादीत नाव येणे म्हणजे आम्हाला कुठेतरी समतेची वागणूक मिळत आहे असे मत किन्नर अस्मिता संस्थेच्या तम्मना केने यांनी व्यक्त केले, त्याच बरोबर जास्तीत जास्त तृतीय पंथीयांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन केले. त्याच बरोबर ज्या तृतीय पंथीयांना आपले नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे त्यांनी किन्नर अस्मिता संस्थेची संपर्क करण्याचे सागितले आहे.


यापूर्वी आमच्या कडे एकही कायदेशीर ओळखपत्र किवा कागदपत्र नव्हते तृतीयपंथी समाज असा आहे कि त्याची आधीची ओळख तो मागे ठेऊन नवीन ओळख त्याला निर्माण करावी लागत होती पट कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे ते खूप आवघड होऊन बसले होते. साधे मोबाईल सीम कार्ड घेण्यासाठी खूप त्र होत होता पण आता सरकारने जी मतदार यादीत नाव नोंदणीची संधी दिले आहे त्यमुळे आम्हाला आमची एक ओळख मिळणार आहे. अशी भावना किन्नर अस्मिताच्या नीता केने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.त्याच बरोबर निवणूक आयोगाचे खूप खूप धन्यवाद मानले.
निवडणूक मतदार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यानी मतदार नोंदणीला तृतीयपंथीयांचा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...