जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरमध्ये महा आरोग्य शिबीर संपन्न, १२०० हुन अधिक गरीब गरजू रुग्णांनी घेतला लाभ........
भिवंडी, बातमीदार: दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ फकरुल उलुम, मस्जिद देवनगर नालापार नारपोली येथे महा आरोग्य शिबिराच आयोजन जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं.
ह्या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, जनरल तपासणी, दंतचिकीत्सा, कोरोना लसीकरण इत्यादी सर्वच प्रकारच्या आजारावर प्राथमिक तपासणी व औषधोपचार करून ऑपरेशन करण्यात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी करून घेण्यात आली. जवळपास १२०० हुन अधिक रुग्णांची नोंदणी करून त्यांची तपासणी करून औषधे पुरवठा ह्या महा आरोग्य शिबिरात करण्यात आली. ३०० लोकांना मोफत लसीकरण करण्यात आलं. ४०० लोकांची नेत्र तापसणी करून ७३ लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. ३५ रुग्ण इतर ऑपरेशन करिता तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई इथे मोफत ऑपरेशन करीता जाणार आहेत.
हे महा आरोग्यशिबिर यशस्वी करण्या करिता जिजाऊ भिवंडी शहर टीम प्रमुख पंकज पवार, भिवंडी शहर समन्वयक फराज शेख, संपूर्ण टीम, फकरुल उलम मस्जिद देवनगर नालापार नारपोली येथील ऍड.गुफरान मोमीन, अल्फला बॉईज ग्रुप ह्या सर्वांनी महत्वपूर्ण सहकार्य करून हा शिबीर यशस्वीपणे करण्यात मोलाचं योगदान दिले.



No comments:
Post a Comment