Saturday, 13 November 2021

भिवंडीमध्ये मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात !! 'लोखंडी पिलरच्या सळईच्या सांगाडा कोसळला' 'अपघातात ८ कामगार जखमी'

भिवंडीमध्ये मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात !! 'लोखंडी पिलरच्या सळईच्या सांगाडा कोसळला' 'अपघातात ८ कामगार जखमी'


भिवंडी, अरुण पाटील दि. १३ : ठाणे ते धामणकर नाका या दरम्यान पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू असताना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेल समोर दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिलरचे काम सुरू आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुमारे ३० ते ४० फूट उंचीचा लोखंडी सळईंचा सांगडा कोसळला. लोखंडी सांगडा हा थेट रस्त्यावर येऊन आदळला. या अपघातात ८ कामगार जखमी झाले असून त्यापैकी तीन कामगारांना गंभीर दुखापत झाली आहे.

लोखंडी सळईंचा सांगाडा रस्त्याच्या मधोमध उभारला जात होता. नजीकचा रस्ता वर्दळीचा आहे. सुदैवाने, हा सांगाडा रस्त्याच्यामध्ये कोसळला परंतु त्यावेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मोहम्मद शाहरुख, मोहम्मद मोहबुत, मोहम्मद अब्दुल अहद, मोहम्मद शकील, मोहम्मद नावेद या जखमी कामगारांना नजीकच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील मार्गिके वर वाहतूक कोंडी झाली होती.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...