Wednesday 17 November 2021

कांबा गावाच्या सुपूत्राचा हरियानात झेंडा, दोनशे किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर कोरले नाव, भारतात प्रथम क्रमांक !!

कांबा गावाच्या सुपूत्राचा हरियानात झेंडा, दोनशे किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर कोरले नाव, भारतात प्रथम क्रमांक !!


कल्याण, (संजय कांबळे) : नँशनल स्टार पावरलिफ्टींग फेडरेशन ने हरियाणा सोनपत येथे आयोजित केलेल्या वेगवेगळ्या वजनी गटातील पावरलिफ्टींग स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कांबा गावचा सुपूत्र योगेश बनकरी याने २००किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरत भारतातून प्रथम क्रमांक पटकावला असून त्याच्या या कामगिरी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर ऐतिहासिक कल्याण नगरिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या कांबा गावातील बनकरी कुंटूब सुरुवातीपासून सधन आहेत. याच कुंटूबातील कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेश बनकरी यांचे छोटे बंंधू योगेश बनकरी याने ६ महिन्यापूर्वी उल्हासनगर येथील जिम जाँईड केली, तेथे नँशनल स्टार पावरलिफ्टींग फेडरेशनचे व्हाईस प्रेंसिडेट व अंतरराष्ट्रीय खेळाडू संजय दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला.


यानंतर रायते गावातील फस्ट फिटनेस जिम येथे स्थंलातर केले, परंतु येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य नसल्याने अडचण निर्माण झाली. परंतु योगेश बनकरी याने स्वतः सुमारे ६० हजार रुपये खर्च करून कोलकता येथून साहित्य आणले, त्यामुळे सर्वच खेळाडूची सोय झाली.


अशातच नँशनल स्टार पावरलिफ्टींग फेडरेशन ने हरियाणा सोनपत येथे वेगवेगळ्या वजनी गटाच्या स्पर्धेचे आयोजन केले. यासाठी रायते येथील फस्त फिटनेस जिमचे सर्व खेळाडू स्पर्धेत उतरण्यासाठी कोच संजय दाभोळकर यांनी तयारी सुरू केली. अपार कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत ,जिंकण्याची तीव्र महत्वकांक्षा या जोरावर महाराष्ट्रातून २१ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. पंजाब, दिल्ली, कलकत्ता, हरियाणा, आणि महाराष्ट्र अशा राज्यातून सुमारे २०० स्पर्धेक उतरले होते. यामध्ये महाराष्ट्राच्या योगेश बनकरी याने २००किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले तसेच भारतातून पहिला क्रमांक पटकावला. याबरोबरच विलास भोईर यांनी भारतात सर्वाधिक वजन उचलण्याचा किताब पटकावला आहे सुवर्ण पदक, सुशील कुंभार ((१६०) सिल्व्हर, दिपक उकिर्डे (१५५) ब्राँझ, कृष्णसजीवनी यादगिरी (१२५) सुवर्ण, लोकेश विश्वकर्मा (१७७) सुवर्ण, प्रतिक देशमुख (१४०), रोहित परेल (१४०), कृशाली लोणे (१६५) ब्राँझ, ओम भारते (१२०) गोल्ड, हर्षल महाले (१४०) सिल्व्हर, स्वराज्य गोयर (१२०), श्रीगणेश देवदिघा (१६०) गोल्ड, सचिन पवार (१३०) गोल्ड, गिरिष भोईर (१५०) ब्राँझ, हर्षदा बागुल (१५०), निवेदिता (११०) गोल्ड, दिपिका कटेजा (१२०) गोल्ड, अनिकेत पांडे (१४०) गोल्ड आणि शिवानी मिरकुटे (७५) किलो वजनी गटात सुवर्ण पदक असे इतर विजेत्या स्पर्धेकांची नावे असून या स्पर्धेचे परिक्षक म्हणून फेडरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट जुगल धवन, आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय दाभोळकर आणि भूप्रेंंद्रा सचदेव यांनी काम पाहिले.

या संदर्भात महाराष्ट्र टिमचे कोच आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय दाभोळकर यांना विचारले असता ते म्हणाले, आज महाराष्ट्र टिमने हरियाणा येथील पावरलिफ्टींग स्पर्धेत वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली, देशात महाराष्ट्राचे नाव उज्वल केले, परंतु आजही हा खेळ ग्रामीण भागात दुर्लक्षित आहे, याकडे शासनाने लक्ष दिले, आर्थिक तरतूद केली तर नक्कीच असे खेळाडू भविष्यात देशाला सुवर्ण पदकांची कमाई करून देतील, असा मला विश्वास वाटतो असे सांगितले तर योगेश बनकरी यांच्या सुवर्ण कामगिरीने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे, असे माजी सरपंच मंगेश बनकरी यांनी म्हटलं आहे.

तर आजच्या योगेश बनकरी व त्यांच्या टिमच्या यशाबद्दल उद्योगपती मोहनशेठ, अनिलशेठ शेलार, प्रसाद शेठ मोरे, राकेशशेठ मोरे, कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच मंगेश बनकरी, उदयोगपती छगन बनकरी, ज्ञानेश्वर बनकरी, बाकाशेठ पावशे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळे, नँशनल स्टार पावरलिफ्टींग फेडरेशनचे सह कार्यवाहक व कोच संजय दाभोळकर आणि कांबा गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1 comment:

  1. खुप खुप अभिमान वाटला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....न्यू प्रगती स्टडी सेंटर उल्हासनगर

    ReplyDelete

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ वाटप !!

महात्मा ज्योतिबा फ़ुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) तर्फे दिवेकरपाडा आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त कपडे, दिवाळी फराळ ,लहान मुलांना खाऊ...