प्राणघातक हल्ला आणि अनुसूचित जातीच्या महीलेचा विनयभंग होऊनही किरकोळ गुन्हा नोंदवुन आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न !!
पिडीतांच्या वतीने कलमवाढ करुन आरोपींना तात्काळ अटक करण्याची अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची मागणी.
भिवंडी - (प्रतिनिधी) काटईबाग भिवंडी येथील सावत्र भावाच्या मुलांनी संपत्ती व मालमत्तेच्या वादातुन प्रविण घरत आणि प्रदिप घरत या दोघांवर तिक्ष्ण व धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला आहे. प्रविण याचा आंतरजातीय विवाह असुन त्याची पत्नी अनुसुचीत जातीची आहे. हल्ल्यामधुन आपल्या पतीला व दिराला सोडवण्यासाठी प्रविणची पत्नी गेली असता हल्लेखोर रतन ऊर्फ जस्टीन प्रकाश घरत आणि राहूल प्रकाश घरत यांनी तीचे अंगावरील गाऊन फाडून वाईट भावनेने अंगलगट केली तीला सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करुन मारझोड केली. या सर्व रणधुमाळीत प्रदिपची पत्नी ही सोडविण्यासाठी आली असतांना तिचाही विनयभंग करणेत आला आहे.
प्रविण घरत आणि प्रदिप घरत हे दोघे सख्ये भाऊ असुन मारेकरी रतन प्रकाश घरत व राहुल प्रकाश घरत हे त्यांच्या सावत्र भावाची मुले आहेत. त्यांना प्रविण व प्रदिप घरत यांचे आईने कमावलेल्या मालमत्तेतील हिस्सा बळकावयाचा असल्याने त्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने प्रविण घरत यांचेवर तिक्ष्ण व धारदार हत्याराने सपासप वार करून गंभीर जखमी केलेले असतांनाही निजामपुरा पोलीस ठाण्यात पोलिसांनी नाममात्र किरकोळ कलमांतर्गत (भादवि. संहितेचे कलम- ३२३, ३२४, ५०४, ३४) गुन्हा नोंद करुन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप पिडीतांनी केला असुन या बाबत त्यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
अॅट्रोसिटी कायद्यात अनुसुचीत जाती/जमातीच्या पिडीतांना मदत करण्याची तरतुद असल्याने संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस अण्णासाहेब पंडीत यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा जाधव व कार्याध्यक्ष डॉ. रमेश सावंत याचेशी विचारविनिमय करुन सदर गुन्ह्यात कलमवाढ करणेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, भिवंडी यांची अण्णा पंडीत यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पिडीतांसह भेट घेतली.
सदर भेटी दरम्यान घडलेल्या गंभीर घटनेची विस्तृत माहिती विशद करुन भादवि कलम ३५४ व ३०७ समाविष्ट करणे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेली व्याख्या "हेतू व जाणिव या घटकांवरुन *खुनाचा प्रयत्न* हा अपराध ठरविला जाऊ शकतो, जखमांच्या स्वरुपावरुन नव्हे." ही बाब सपोआ सुनिल वडके यांचे निदर्शनास आणून दिली. तसेच विनयभंग झालेली पिडीत महीला ही अनुसुचीत जातीची आहे हे आरोपींना माहीत असल्याने सदर गुन्ह्यात अनु. जाती/ अनु.जमाती (अत्याचार प्रतिबंध) संशोधित अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(आर), ३(१)(यु), ३(१)(डब्ल्यू) (एक), ३(१)(डब्ल्यू)(दोन), ३(२) (पाच), ३(२)(पाच-ए) इत्यादी कलमांचा तात्काळ समावेश करुन आरोपींना अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास समविचारी पक्ष संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी अण्णा पंडित यांच्या नेतृत्वाखाली भेटीगाठी गेलेल्या संघटनेच्या शिष्टमंडळात पिडीतांसह राजन गायकवाड, संजय गायकवाड हे उपस्थित होते.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती :
☎️ - +91 87797 43002



No comments:
Post a Comment