Friday, 12 November 2021

मुरबाड पोलिस प्रशासना विरोधात रिपाई सेक्युलरचा धरणे आंदोलन !!

मुरबाड पोलिस प्रशासना विरोधात रिपाई सेक्युलरचा धरणे आंदोलन !!


मुरबाड ( मंगल डोंगरे) : मुरबाड पोलिसांच्या गैरवर्तना विरोधात रिपाई सेक्युलर मुरबाड तालुक्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.


कृषी उपयोगी जनावरे बेकायदेशीर हेतूसाठी वाहतूक करणारे मुख्य मोकाट आरोपींवर कारवाई करा, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टराची फौजदारी चौकशी करण्यात यावी, तालुक्यातील बेकायदेशीर जुगार, गुटखा व गावठी दारूच्या धंद्यावर तसेच चोऱ्यांचे वाढते प्रमाण यावर वचक ठेवावा, दिवंगत सुरेश श्रीपत अहिरे यांच्या मृत्युस कारणीभूत असणाऱ्या मुख्य आरोपीस अटक करावी, मौजे- साकुर्ली येथील बौद्ध वस्तीच्या जागेवर अनाधिकृत अतिक्रमण करणाऱ्या गाव गुंडांवर कारवाईस करावी, मौजे- इंदे येथील अदिवासी कातकरी जमातीचे श्री. गजानन बाबू वाघ यांचेवर साक्ष देण्यासाठी बेकायदेशीर रित्या दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी सकाळी ११ वाजेपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर तर्फे ठाणे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने साहेब यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. 

तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठाणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावून मागण्यांचे निवेदन स्वीकारून सर्व मुद्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने सदर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुकाध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, तालुका युवक अध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सचिन धनगर, जगदीश साटपे, रविंद्र गायकवाड, अविनाश रातांबे व रिपाई सेक्युलर मुरबाड तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...