Friday, 12 November 2021

मेडिकल कॉलेज मंजुरी आणि डॉ. सलीम अली प्रस्तावित पक्षी अभ्यास केंद्र म्युझियम या प्रकरणी पालकमंत्री अदिती तटकरे यांची माणगांव येथे पत्रकार परिषद संपन्न...

मेडिकल कॉलेज मंजुरी आणि डॉ. सलीम अली प्रस्तावित पक्षी अभ्यास केंद्र म्युझियम या प्रकरणी पालकमंत्री अदिती तटकरे यांची माणगांव येथे पत्रकार परिषद संपन्न... 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्याच्या  पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांनी शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी अर्थात डॉ. सलीम अली यांच्या जन्म दिनी तथा जयंती दिनी माणगांव शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या अलिबाग उसर येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय तथा मेडिकल कॉलेज ला मिळालेली प्रशासकीय मंजुरी आणि त्यामुळे तमाम रायगड करांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न साकार आणि रायगड जिल्ह्याच्या अलिबाग किहीम येथील भारतातील आद्य पक्षि शास्त्रज्ञ, पर्यावरण चळवळीचे प्रणेते, पर्यावरण वादी डॉ. सलीम अली यांच्या राहत्या घरी आणि किहीम प्राथमिक शाळा या ठिकाणी डॉ. सलीम अली यांना तथा त्यांच्या कार्याला डेडिकेटेड समर्पित डिजिटल थ्रीडी रुम म्युझियम पक्षी अभ्यास केंद्र असले पाहिजे या प्रामाणिक भावनेतून सदर पक्षी अभ्यास केंद्र तथा डिजिटल म्युझियम पर्यटकांना आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरेल असे म्युझियम आम्ही प्रस्तावित करत आहोत. या दोन विषयांवर सदर पत्रकार परिषद रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती ताई तटकरे, पत्रकार, मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. 
      सदर पत्रकार परिषदेस मान्यवर सुभाष केकाणे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, माणगांव सह जिल्ह्यातील पत्रकार, प्रशाली जाधव- दिघावकर माणगांव प्रांत अधिकारी, प्रियांका आयरे तहसीलदार माणगांव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...