Wednesday, 10 November 2021

कृषी कायद्याविरोधात लढाई ही दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाची नांदीच..!! "शहीद किसान अस्थी कलश यात्रा त वक्त्यांचा सूर् वढोदा येथे सभा"..

कृषी कायद्याविरोधात लढाई ही दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाची नांदीच..!!  "शहीद किसान अस्थी कलश यात्रा त वक्त्यांचा सूर्  वढोदा येथे सभा"..


(वढोदे येथील सभेत बोलतांना काम्रेड राजू देसले)

चोपडा, बातमीदार : अखिल भारतीय किसान सभा तरफे महाराष्ट्र भर शेतकरी शहिदांचा अस्थी कलश यात्रा १०००गावात आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड अशी एक यात्रा काल रोजी जळगाव पासून जिल्हा किसान सभा तर्फे आयोजित करण्यात आली होती. जळगाव येथून शिवतीर्थ मैदान मधून सकाळी यात्रेस प्रारंभ करण्यात आला काल दुपारी १२ ते ७ या वेळात ही यात्रा चोपडा तालुक्यातील धानोरा, अडावद, चोपडा शहर, तेथून गलंगी व वढोदा गावी गेली. या चारही गावांना राष्ट्रवादी काँग्रेस लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी हे साखर लाल महाजन, माजी सरपंच अडावद प्रदीप पाटील, लोक संघर्ष मोर्चा एस बी पाटील, शेतकरी नेते यांनी अनुक्रमे अडावद, चोपडा, गलनगी. या ठिकाणी झालेल्या सभामध्ये येऊन शहीद शेतकरी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन शेतकरी आंदोलन का पाठिंबा दर्शवला भारतिय कमुनिस्ट पक्षाचे जळगाव जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, अमळनेर किसान सभेचे सचिव चंद्रकांत माळी, लेनिन महाजन चोपडा, अरमान तडवी, गुपत्यारी बाई तडवी, जिजाबाई राजपूत, ठगू भोई सर्व अडावद संजय महाजन व अशोक महाजन धानोरा गोरख वानखेडे वधोड यांनी परिश्रम घेतले.. शेवटी सायंकालीन ५.३० वाजता व रात्री वढोदा येथे चौकात अभिवादन सभा घेणेत आली तेथील सभेचे अध्यक्ष बाळू निंबा पाटील होते.. शिवसेनेचे हुकूम पाटील यांनी प्रास्ताविक केले त्या सभेत मुख्य वक्ता कलश यात्रेचे व संयोजक प्रा. राजू देसले म्हणाले की, दिल्लीत देशातील शेतकरी करत असलेली ही दुसरी स्वातंत्र्याची लढाई असून फसिस्ट मोदी सरकारचे शेतकरी, शेतमजूर, कामगार विरुध्दची धोरणे हाणून पाडण्यासाठी सर्व लोकशाही संविधानवादी लोक b संघटना यांनी एकत्र यावे असे सांगुन पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरि येथे गत ३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने केलेले ३ शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा. शेती मालास हमी भावाचा कायदा करावा साठेबाजी मुक्त करावा या मागणीसाठी निवेदन घेऊन गेले होते गृहराज्य. मंत्री महोदय भेटणेसाठी गेले होते ते भेटणे आधीच गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांचे जथ्या घालून देण्यात आली. त्यात ४ शेतकरी व एक पत्रकार मारला गेला. 

.त्या.. शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचं नसेल तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सरकार रेशन व्यवस्था मोडकलीस आणत आहे म्हणून "शेतकरी बचाव देश बचाव मोदी हटाव" .. आंदोलनाची गरज आहे मोदी सरकारने ११ महीनेपासून दिल्ली येथे चाललेल्या ५५० शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती... म्हणून सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. या सभेत सर्वश्री अमृत महाजन मदन परदेशी शिरपूर यांची भाषणे झाली कॉ. गोरख वानखेडे यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांना या केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या दुष्परिणामची माहिती देण्यासाठी      अखिल भारतीय किसान सभेतर्फे शेतकरी शहिदांच्या अस्थीकलश यात्राचे आयोजन करण्यात आले. या अभिवादन सभेत यात्रेचे संयोजक का. प्रा राजू देसले ..आत्माराम विशे ठाणे रमेश जाधव, भास्कर शिंदे, नासिक निवृती गजबे, तसेच आल इंडिया स्टूडेंट फेडरेशनचे विराज देवांग साक्षी पाटील, प्राजक्ता कापडणे यांचा चमू सहभागी होता. शिंदे, प्रा. राजू देसले यांनी यात्रेची भूमिका मांडली. आल इंडिया स्टूडेंट फेडरेशनचे विराज देवांग, साक्षी पाटील ,प्राजक्ता कापडणे यांचा चमूने क्रांती गीत गायन केले तर कॉ. अमृत महाजन, भास्कर शिंदे, आत्माराम विशे, लक्ष्मण शिंदे यांची सर्व श्री. विनोद सपकाळे, पांडू कोळी, राजू पाटील, पंढरीनाथ पाटील, रामचंद्र पाटील, रवी पाटील, रवी पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली *महाराष्ट्रात* ह्या यात्रा नागपूर येथे १८ नोव्हेंबर रोजी नागपूरला समारोप रॅली "किसान सभेचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड अतुलकुमार अंजान" यांची उपस्थितीत होईल.*  नंतर २८ नोव्हेंबर रोजी "शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश तिकैत" यांचे उपस्थितीत प्रंचड मेळावा होईल अशी माहिती का. देसले यांनी अभिवादन मेळाव्यात दिली..

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...