अहोरात्र रुग्ण सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ. प्रदिप इंगोले यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्यातील माणगांव उपजिल्हा रुग्णालाचे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य तत्पर वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप इंगोले यांना कोकण पदवीधवीर संघाचे लोकप्रिय आमदार अनिकेतभाई सुनिल तटकरे यांच्य़ा प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
निजामपूर विभाग खासदार सुनिल तटकरे प्रतिष्ठान आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात माणगांव उपजिल्हा रुग्णालाचे कार्यतत्पर वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांना या प्रसंगी शाल, श्रीफळ, गुच्छ, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. सदर सत्कार निजामपूर विभाग खासदार सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान करण्यात आला होता.
माणगांव उपजिल्हा रुग्णालाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी गेली दोन वर्षे कोरोना काळात केलेल्या अहोरात्र सेवेची दखल घेत अनेक संस्था, मंडळ, संघटना, असोसिएशन, फाऊडेशन तसेच शासकीय स्थारावर सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. प्रदीप इंगोले यांनी महाड-चिपळूण येथे आलेल्या महापूरादरम्यान मृत्यू पावलेल्या व गंभीर जखमी झालेल्या पीडितग्रस्तांची अत्यंत कठीण काळात अत्यंत प्रामाणिकपणे व इमानेइतबारे दिवसरात्र सेवा केली. त्याच बरोबर डॉ. प्रदीप इंगोले हे उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक वैद्यकीय उपक्रम, उपकरण व भावी काळासाठी जनतेला इतर आरोग्य नियोजनाचा मानस ठेवून आपली सेवा बजावत आहेत.
डॉ. प्रदीप इंगोले यांचा सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या हितचिंतकां कडून त्यांचे समाजातील सर्व स्थरातून सोशल मीडिया, वॉट्स्अप, फेसबुक आणि प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment