Monday, 15 November 2021

आवंदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी समाधानात !!

आवंदा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी समाधानात !!


चोपडा, बातमीदार.. तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना दिवाळीच्या दोन दिवस अगोदर पंचायत समितीने जलसुरक्षा मानधन टाकली काही पंचायतींनी पगार लवकर दिला बोनस दिला त्यामुळे या वर्षाची दिवाळी अत्यंत आनंदात गेली त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातही दिवाळी अगोदर जलसुरक्षा मानधन दिले शिवाय राज्य सरकारने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनाचे 50% अनुदान पगार अनुदान ही आकृतीबंधतील कर्मचारीना दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मागील वर्षाचे तुलनेत यावर्षी बऱ्यापैकी समाधानाचे वातावरण आहे असे जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नेते अमृत महाजन, संतोष खरे ,किशोर्जी कांडारे, शिवशंकर महाजन यांनी म्हटले आहे

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...