Monday, 8 November 2021

भाजपाच्या ओबीसी जागर अभियानाचे म्हारळ गावात उद्घाटन, कार्यकत्यामध्ये उत्साह !!

भाजपाच्या ओबीसी जागर अभियानाचे म्हारळ गावात उद्घाटन, कार्यकत्यामध्ये उत्साह !!


कल्याण, (संजय कांबळे) :
जुलमी राज्यसरकारने जाणीवूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो. तसेच या सरकारच्या विरूध्द एल्गार करून आम्ही समस्त ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय अस्तित्व कोण संपवू पाहत आहे याचा जागर करतोय. 


ही लढाई ओबीसीच्या अस्तित्वाची असून, जो पर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तो पर्यंत ही लढाई सुरूच राहील.


आज राजकिय आरक्षण काढले उद्या शिक्षण व नोकरीचे आरक्षण काढतील. तिघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते अशी घोषणा करित आज ओबीसी जागर अभियानाचे उदघाटन माजी उपमहापौर मीना आयलानी यांच्या हस्ते म्हारळ गावदेवी मंदिर परिसरात करण्यात आले.


या वेळी उल्हासनगर माजी महापौर श्रीमती मीना कुमार आयलानी, महासचिव श्रीमती मंगला चांडा, भाजप ओ बी सी जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष तानवडे, महिला अध्यक्षा श्रीमती स्नेहलता कलशेट्टी, जिल्हा सचिव अनिल कट्यारे, मंडळ 1 अध्यक्ष ,श्रीधर यादव, श्रीमती भावना पेडणेकर, श्री अपर्णा  खर्चे, श्रीमती मंगल गाढवे, प्रमोद देशमुख, महेश खोत, योगेश देशमुख, विकास पवार, अतिष म्हात्रे, लक्ष्मन कोंगेरे, महेश देशमुख, पांडुरंग म्हात्रे, मनीषा नागरे, वैशाली पगारे, सुनीता झा, राजेश यादव, युवा प्रमुख मंगेश केने, श्री अंजनी पोद्दार, श्री परशुराम ढाईफुले, श्री अजय जाधव, श्रीमती रीना पोद्दार आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते सदर जागर अभियानचा रथ यात्रा पूर्ण उल्हासनगर मध्ये फिरणार आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात ओबीसी जागर अभियान रथाचे आगमन होताच येथील कार्यकर्ते मंगेश केणे व इतरांनी जोरदार स्वागत केले. म्हारळ सोसायटी ते गावदेवी मंदिर असा हा रथाचा प्रवास करून लोकामध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची कशी फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावावर राजकारण कसे केले जाते याबाबत ओबीसी आरक्षण जागर अभियान रथाचे माध्यमातून दाखवण्यात आले. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...