Tuesday, 9 November 2021

कल्याण पंचायत समितीच्या मासिक सभेत गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या अभिनंदनांचा ठराव सर्वानुमते मंजूर !!

कल्याण पंचायत समितीच्या मासिक सभेत गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या अभिनंदनांचा ठराव सर्वानुमते मंजूर !!


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या प्रशासकीय कामात नियमांचे काटेकोर पालन करून कडक शिस्त लावण्यासाठी तडजोडीला थारा न देणारे, आणि कामाप्रती दिलेला शब्द पाळणारे शिस्त प्रिय गटविकास अधिकारी म्हणून ओळखले जाणारे, कल्याण पंचायत समितीचे नवनियुक्त बीडीओ अशोक मंगलदास भवारी यांच्या अभिनंदनाचा ठराव नुकत्याच झालेल्या सदस्यांच्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे प्रशासनात एक नवा पांयडा पडल्याने समाधान व्यक्त होत आहे.


ग्रामपंचायत असो की पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रत्येक वेळी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, बीडिओ, सभापती सदस्य, तर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्यात म्हणजे च प्रशासन व लोकप्रतिनिधी मध्ये खंडाजगी उडाल्याची अनेक उदाहरणे आहेत. उलट प्रशासन व लोकप्रतिनिधी मध्ये समन्वयक असेल तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा नक्कीच फायदा होतो.


कल्याण पंचायत समितीचा विचार केला तर मागील गटविकास अधिकारी व कल्याण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य यांच्यात अनेक वेळा खटके उडाले होते. यामुळे तालुक्याचे नुकसानच झाले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून शहापूर पंचायत समितीचे बीडिओ अशोक मंगलदास भवारी यांची नियुक्ती झाली. त्यांच्या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार ते कल्याण येथे कसे काम करतात, याविषयी शंका होती, कारण एक तर ते नियमांचे बाबत काटेकोर, शिस्तबद्ध कामाचे नियोजन, कामचुकारांचे "यमराज" जवळचा लांबचा असा भेदभाव न करता प्रशासकीय कामात उत्तम असणाऱ्याना पाठिंबा देणारे, हुजरेगिरी करणाऱ्या पासून चार हात लांब राहणे पसंत असणारे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या कोणालाही शिंगावर घेणारे, स्टेट फाँरवर्ड, जशास तसे उत्तर देणारे, हजरजबाबी असे काहीसे व्यक्तीमत्त्व असणारे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी पदभार स्विकारताच सर्व पंचायत समितीच्या सदस्यांची तक्रार होती की, यापूर्वी मासिक सभेचे इतिवृत्त कधीच वेळेवर मिळत नाही.? यावर आता असे होणार नाही, पुढील मासिक सभेच्या अगोदर आपल्याला सभेचे इतिवृत्त मिळेल असा शब्द अशोक भवारी यांनी दिला होता. आणि ते खरेही केले.


मागील १८/१०/२०२१ च्या मासिक सर्वसाधारण सभेला येताना सर्व सदस्यांच्या हातात मासिक सभेचे इतिवृत्त होते. त्यामुळे पंचायत समितीचे सदस्य रमेश भाऊ बांगर यांनी अशोक मंगलदास भवारी यांनी वेळेत नियमित मागील सभेचे इतिवृत्त सर्व सदस्यांना पोहच केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे सूचविले, याला माझी सभापती श्रीमती रंजना केतन देशमुख यांनी अनुमोदन दिले व हा अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.

याबरोबरच निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत असलेले डॉ. राठोड यांनी कोव्हिड लसीकरण काम अंत्यत उत्तम रितीने केल्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन या सभेने केले.

या सभेला महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, एम एम आर डी ए ,सार्वजनिक बांधकाम विभाग, दुरध्वनी सेवा आदी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. तर याबाबतीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी पत्रव्यवहार करणयाचे सुतोवाच सभेचे सचिव तथा गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...