लखिंमपुर खेरी. शहीद. किसान अस्थिकलश यात्रा नियोजनासाठी कार्यकर्ता बैठक !!
जळगाव, बातमीदार.. येथे डॉक्टर आशिष जाधव यांचे अध्यक्षतखाली घेण्यात आली. उत्तर प्रदेशातील लखीमपर खेरी येथे गेल्या महिन्यात मंत्री गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनांच्या ताफ्यात चार शेतकरी व पत्रकार चिरडले गेले आणि 12 शेतकरी जखमी झाले हे सर्व शेतकरी आंदोलक मंत्र्यांना मोदी सरकारने 'तिन्ही कृषी कायदे मागे घ्या' 'वीज कायदा मागे घ्या' 'शेती माल हमी भाव कायदा करा' असे निवेदन देण्यासाठी आले होते. त्या हुतात्म्यांची अस्थी कलश यात्रा जळगाव येथून धुळे जिल्ह्यात जाणार आहे
त्यादृष्टीने नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यात ठरले की, शिवतीर्थ मैदान वर ८/११/२१ सोमवारी सकाळी अभिवादन करणे.. तेथून ११ व ममुराबाद.. इदगाव.. धानोरा, अडावद वरून चोपडा गलांगी वधोदा.. होलनंथा धुळे येथे जाईल.. लोकसंघर्ष मोर्चा, लाल बावटा शेतमजूर युनियन.. भारतीय युवा लोकशाही जनक्रांती पार्टी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा सैनिक समाज पार्टी, आदिवासी महासभा, आयटक यांचा जाहीर पाठिंबा व सहभाग राहणार आहे. असे अस्थी कलश अभिवादन यात्रा आयोजन समितीचे निमंत्रक कॉम्रेड अमृतराव महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी दौलत पाटील, भा क प जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, शेतमजूर युनियनचे संघटक विनोद आडलके, आय टक चे वीरेंद्र पाटील, पी वाय पाटील, राजेंद्र झा, भारतीय युवा लोकशाही जन क्रांतीचे डॉक्टर आशिष जाधव, ईश्वर मोरे, गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, चंद्रकांत माळी, अरमान तडवी, मधुकर मोरे, मुकुंदराव सपकाळे, एडवोकेट भरत गुजर, कालू कोळी, आदींनी कळवलेले आहे तरी अस्थिकलश अभिवादनासाठी जास्तीत जास्त शेतकरी शेतमजूर कामगार महिला यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे..

No comments:
Post a Comment