Sunday 21 November 2021

ठाणे - मुंब्रा परिसरात एम डी पावडर विकणाऱ्या टोळ्या सक्रिय, पोलिसांनी केली दोघांना अटक.!!

ठाणे - मुंब्रा परिसरात एम डी पावडर विकणाऱ्या टोळ्या सक्रिय, पोलिसांनी केली दोघांना अटक.!!


भिवंडी, दिं,22, अरुण पाटील (कोपर) :

ठाणे - मुंब्रा परिसरात एम डी पावडर विकणाऱ्या टोळ्या सक्रिय असून त्या बाबतची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी धडक कारवाई करत यात 16 लाखांच्या एमडी पावडरसह दोघांना अटक केली असून सध्या ड्रग्सचा धंदा करणाऱ्याविरोधात मुंब्रा पोलिस चांगलीच मोहीम राबवत आहेत .

पोलिसांना दोघां आरोपींकडून 210 ग्रॅम एमडी नावाचा अंमली पदार्थ हस्तगत आहे. या एमडीची बाजारात तब्बल 16 लाख एवढी किंमत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली.19 नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील PSI काळे यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा बायपास रोडवर सापळा रचून गोडविन इमानियल इफेनजी या 41 वर्षीय नायजेरियन नागरिकाला अटक केली.

त्याच्या अंगझडतीत पाच लाख रुपये किंमतीची 100 ग्रॅम एमडी पावडर सापडली. दुसरी अंमली पदार्थाची कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. ज्यात पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोड एक इसम मोफेडीन (एम.डी.) पावडरसह विक्री करण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नदीम मेहबुब खान याला जेरबंद केलं. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्रॅम मोफेड्रोन एमडी पावडर हस्तगत केली. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून सदर अंमली पदार्थ त्यांनी कुठून मिळवले आणि ते कोणाला विकणार होते याचा पोलीस अधिक तपास करत

No comments:

Post a Comment

आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान !

आज ठाण्यात योगेंद्र यादव यांचे व्याख्यान ! ठाणे दि. ५ आज बुधवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात, सायं. ७ः३० वा. भारत जोडो अ...