पत्रकार दीपक मांडवकर शिव स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने "दक्ष पत्रकार" पुरस्काराने सन्मानित !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
शिव स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी चौथ्या वर्धापनदिना निमित्ताने आज (दि.२१ नोव्हेंबर) कला, क्रीडा, सामाजिक, कलाकार व पत्रकार याना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात गोरगरीब जनतेचा सेवक व अन्याया विरोधात सदैव तप्तर व कर्तव्य दक्ष असलेले पत्रकार श्री. दिपक तुकाराम मांडवकर याना दक्ष पत्रकार पुरस्कार देऊन शिव स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी यांनी सन्मानीत केले.श्री. दिपक तुकाराम मांडवकर हे रत्नागिरी येथील लांजा तालुक्यातील खानवली गावचे सुपुत्र असून अत्यंत गरीब कुटुंबातील हाल अपेष्टा सहन करून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विभागामध्ये काम करत असताना या गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कामाची दखल घेत आज विविध संस्था, प्रतिष्ठान, संघटना, राजकीय पक्ष, यांच्यात मोठा हातखंडा प्रामुख्याने दर्शविला जातो. तर हा दक्ष पत्रकार पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विलास सुवरे, पालघर जिल्ह्याचे शैक्षणिक मार्गदर्शक श्री. मिलिंदजी पाटील, समाजसेवक श्री. किशोरजी भेरे, उद्योजक मार्गदर्शक वसई शहर श्री. अनंतजी फिलसे, संजीवनी रुग्णालय अधिकारी श्री. तुकारामजी पष्टे सर, श्री. अविनाशजी पाचकळे सर या सर्वांनी हा पुरस्कार प्रधान केला. तर श्री. दीपक मांडवकर यांनी हा पुरस्कार प्रथम आई - बाबा, परिवार सह सर्व गुरुवर्य आणि समाजसेवे चरणी अर्पण करतो. व प्रसार माध्यम हा वसा प्रत्येक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व अन्याया विरोधात लढण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे अंततः मनोगत वेक्त केले. व शिव स्वराज्य प्रतिष्ठाण रत्नागिरीचे आभार मानले.त्यांना हा मनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment