शिवसेना शाखा क्रमांक १७ यांच्या संयुक्त विद्यमाने शिंपोली गाव ब्रह्मा विष्णू मंदिर येथे पहिला व दुसरा कोविड लसीकरण डोसला उत्तम प्रतिसाद !!
मुंबई, (समीर खाडिलकर/ शांताराम गुडेकर) :
बृहन्मुंबई महानगरपालिका व शिवसेना शाखा क्रमांक १७ यांच्या संयुक्त विद्यमाने शिंपोली गाव ब्रह्मा विष्णू मंदिर येथे पहिला व दुसरा कोविड लसीकरण डोसचे आयोजन केले होते. यामध्ये ८८ नागरिकांनी लसीकरणाचा फायदा घेतला.कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख श्री. दामोदर जी. म्हात्रे, शाखा क्रमांक पंधराचे शाखाप्रमुख श्री. सचिन म्हात्रे यांनी उपस्थिती लावली. सौ. वंदना नार्वेकर, उपशाखाप्रमुख प्रवीण राऊत, मिलन सावंत, बाबू पडवळ, संदीप परब, अमर पाटील, जेपी भाई, किशोर कांचन, सनी घाडी, रितिक पाटील सौ.योगिनी लाड, श्री.सुरेश लाड यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी शिवसेना शाखाप्रमुख सुनील पाटील यांनी आभारप्रदर्शन करून या लसीकरण कार्यक्रमची सांगता केली.
No comments:
Post a Comment