कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ - मुंबई (रजि.) व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने, “गौरी गणेश नृत्य स्पर्धा” २०२१ संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ - मुंबई (रजि.) व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने, “गौरी गणेश नृत्य स्पर्धा” २१ मुक्काम भवानी नडगाव, तालुका महाड येथे मोठ्या दिमाखत संपन्न झाल्या. आमदार भरतशेठ गोगावले आणि जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांच्या उपस्थित आणि जेष्ठ शाहीर सोनूबुवा दंवडे यांच्या शुभहस्ते रिंगणमध्ये श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रथम क्रमांक बक्षीस रोख रुपये ५०००/- सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी -विजेते अमर नाच मंडल करंजखोल- महाड, द्वितीय क्रमांक बक्षीस रोख रुपये ३०००/- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी - भैरवनाथ कला मंडळ तुरेवाडी- मंडणगड तालुका, तृतीय क्रमांक बक्षीस रोख रुपये २०००/- सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,-विजेते भैरीभवानी नृत्य कला मंडळ भवानी नडगाव, उत्तम नृत्य -जय बजरंग कलापथक चोचिंदे - सन्मान पत्र, नटराज - ढोलकी, उत्तम कवी विजेते पारितोषिक - डॉ. सूर्यकांत चव्हाण - सन्मानपत्र, सरस्वती प्रतिमा, उत्कृष्ट ढोलकीपट्टू विजेते पारितोषिक -सिद्धेश धाडवे सन्मानपत्र, ढोलकी उत्कृष्ट गायक -शाहीर कमलेश शिगवण-सन्मानपत्र, माइक शिवाय सहभागी कलापथक संघाना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र आणि ढोलकी मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच १५ वरिष्ठ शाहीर कलाकार यांचा शाल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कलगीतुरा मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे यांच्या धर्मपत्नी सौ. श्वेता संतोष धारशे यांचा सुद्धा शाल श्रीफळ साडी देऊन मंडळांनी सन्मान केला शिवाय भवानी नडगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालय कोरोना जाणीव जागृती अभियान कलाकार निवड समिती सदस्य पदी निवड झाल्या बद्दल श्री संतोष गोविंद धारशे यांचा शाल, श्रीफळ, बुके आणि सरस्वती देवीची प्रतिमा देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रशेठ सावंत,भाजप महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, समाजसेवक इनायत देशमुख गावचे पोलीस पाटील अनिल किजबिले आणि सरपंच राजनीबाई बैकर, महाड मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, सेक्रटरी अंकुश जाधव, कोलाड मंडळाचे अध्यक्ष सुरेशदादा महाबळे सेक्रेटरी, नथुराम पाष्टे, शाहीर वसंत भोईर, कुणबी युवाध्यक्ष समीर रेवाले, दीपक महाडिक, संतोष घुळघुले यांनी हजेरी लावली. कलगी तुरा मुंबई मंडळाचे पंच डॉ. सूर्यकांत चव्हाण, शाहीर भारदे गुरुजी, ढोलकी पट्टू शाहीर सुरेश चिबडे, शाहीर शशिकांत लाड, शाहीर अनंत येलमकर, शाहीर अनंत मुंगळे, शाहीर कृष्ण जोगळे आणि शाहीर निलेश जोगळे यांनी पहिले तर सरपंच मंडळाचे अध्यक्ष शाहीर अनंत तांबे, शाहीर माजी अध्यक्ष चंद्रकांत गोताड आणि सरचिटणीस शाहीर संतोष धारशे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सरचिणीस संतोष धारशे, खजिनदार सत्यवान यादव, चिटणीस सुधाकर मास्कर आणि शाहीर चंद्रकांत धोपट आणि अरविंद किजबिले यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालय संतोष धारशे, सुधाकर मास्कर, आनंद दवंडे, नैनेश बैकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सरचिटणी संतोष धारशे, खजिनदार सत्यवान यादव, चिटणीस सुधाकर मास्कर, सुरेश चिबडे, निलेश जोगळे , शरद कदम, पोल्स नडगावचे पोलीस पाटील अनिल किजबिले, शाहीर सुभाष नगरकर, विठोबा कदम, नैनेश बैकर सोनु दगडू अगबूल, वसंत बैकर, आनंद दवंडे, बळीराम घुरुप, रवींद्र दवंडे, गणेश बैकर, कृष्णा मोरे, (परशुराम) बाळाराम कदम सुधीर दंवडे, महेंद्र दंवडे, परेश दवंडे, बाळा पांडे, समीर रेवाले, नितेश शेंडल, प्रकाश अगबूल, चंद्रकांत घुरुप, रामू दवंडे, संतोष आटले, सर्व ग्रामस्थ मंडळ नडगाव, मुंबई मंडळ, तरुण मंडळ आणि महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment