महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री.मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात कामगार राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांची घेतली भेट !!
"ई-काॅमर्स क्षेत्रातील डिलिव्हरी बाॅइजना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात केली चर्चा"
मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर ) :
ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून किराणा सामान, खाद्यपदार्थ अशा सर्वच वस्तू घरपोच देणाऱ्या ई-काॅमर्स क्षेत्रातील डिलिव्हरी बाॅइजना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री.मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्रालयात कामगार राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांची भेट घेतली. "मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तसंच देशभरातील विविध ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये लाखो डिलिव्हरी बॉइज काम करत असून त्यांना 'कामगार' म्हणून मान्यता मिळणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी कामगार कायद्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असून त्यानंतरच त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल", अशी भूमिका श्री. मनोज चव्हाण यांनी यावेळी मांडली. मनसेने आमच्या निदर्शनास आणून दिलेला ई-कॉमर्स कामगारांचा विषय गंभीर असून काही दिवसांतच यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक आयोजित केली जाईल" असं आश्वासन श्री. बच्चू कडू यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात पक्षाचे सरचिटणीस श्री. कीर्तिकुमार शिंदे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री.राजेश उज्जैनकर, चिटणीस श्री.केतन नाईक, श्री.निलेश पाटील आणि श्री.गणेश खंडारे यांचा समावेश होत.
No comments:
Post a Comment