गावाचे भवितव्य तरुणाईच्या खांद्यावर- उपसरपंच प्रकाश तोरस्कर....
"अनिष्ट प्रथा ज्या आवश्यक नाहीत त्या बंद केल्या पाहिजेत जेणेकरून लोकांचा पैसा, वेळ वाचेल असा ठराव"
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरापासून जवळ असलेल्या कासारकोळवण गावातील श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ (रजि.) मु.पो. कासार कोळवण, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे माजी अध्यक्ष व उपसरपंच प्रकाश तोरस्कर, महेश कांबळे, इजहार खान, खालिद खान, महेंद्र दळवी, अध्यक्ष रवींद्र करंबेले, माजी उपाध्यक्ष शंकर करंबेले, युवा कार्यकर्ता प्रशांत करंबेले, खजिनदार राजेंद्र करंबेले, एकनाथ कदम, माजी सचिव गजानन करंबेले, गावकर तुकाराम, करंबेले पुजारी, जमीन देणगीदार राजाराम करंबेले, माजी उपसरपंच मनोहर करंबेले, सुधीर कलये, मनोज करंबेल, सुनील आलीम, पत्रकार मोहन कदम आदीसह अन्य पदाधिकारी, सदस्य व सभासद यांच्या उपस्थित आणि मार्गदर्शनाखाली सत्कारमुर्ती सन्मा. विश्वजीतजी चिंदरकर (उद्योगपती/ समाजसेवक-मुंबई) यांचा सत्कार कुटुंब मेळावा आयोजित केल्याबद्दल संघटनेचे गावकर तुकाराम करंबेळे व शंकर रामा तोरस्कर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.
तरुण पिढीने तन, मन, धन, अर्पून आज समाजसेवा केली पाहिजे आपले नेतृत्व व कौशल्य सिध्द करण्याची क्षमता अंगी बाळगून आज आपल्या गावात मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यापेक्षा आपल्या गावात राहून नोकरी, व्यवसाय करावेत आपल्या गावात बेरोजगारी पुरून टाकून, गोर गरिबांना जवळ करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आज युवा पिढी नेतृत्व म्हणजे लाथ मारीन तेथे पाणी काढीन असा जोश असला पाहिजे. आपल्या शैक्षणिक क्षेत्रात वैचारिक दृष्टीकोन लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञान विकसित दृष्टिकोन आधुनिक युगात प्रवाहाबरोबर राहून गावचा विकासाबाबत विकासासाठी ध्येय गाठण्यासाठी वैचारिक दृष्टीकोन बदलला पाहिजे आजही समाजात विषमता आहे अत्याचार ,पिळवणूक, महिलांचे प्रश्न, बुरसटलेली अंधश्रद्धा ह्या जुन्या चाली रीती व अनिष्ठ प्रथा आज ज्या अनावश्यक आहेत या विषयावर आपले हक्क व मानव अधिकार काय आहेत संविधानचा अभ्यास करून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणले पाहिजे.
आज बहुतेक गावांमध्ये आपण पाहतोय फक्त क्रिकेट टुर्नमेंट साठी व लग्न, बारसे, वाढदिवस साजरा व सर्टिफस्ट पार्टी मज्जा करण्यात धन्यता मानत आहेत आज सर्व युवकांनी जर का वाडी, गाव, व समाजासाठी कल्याण कारी व गावच्या विकास कामांना चालना देण्यासाठी व कामे करण्यासाठी पुढे आले पाहिजे लोकशाहीचा वसा घेता आज पूरक वातावरण नवे तंत्रज्ञान नवे विचार नवे कौशल्य व विज्ञानाची कास धरून आपल्या समाजात आमूलाग्र बदल घडवून आणला पाहिजे माणसाच्या स्पर्शाने जर का माणूस बाटत असेल तर बाटलेला माणूस पशूच्या मूत्राने कसा शुद्ध होतो. अश्या अनेक अंधश्रद्धा निर्मुलन करणे आवश्यक आहे. आज या आपल्याला छोट्या गोष्टी वाटत असतील पण आत्तापासूनच सुरुवात नाही तर पुढची पिढी कशी घडणार आहे या गोष्टींचा विचार करावा व सर्वानी समविचाराने एकत्र यावे तरच आपल्या गावचा सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. असे मत उप सरपंच प्रकाश तोरस्कर यांनी व्यक्त केले. माजी अध्यक्ष व उपसरपंच प्रकाश तोरस्कर यांनी दर गुरुवारी अध्यात्मिक प्रवचन करावे असे सूत्रसंचालन करणारे मोहन कदम यांनी यावेळी सुचवले. उपसरपंच प्रकाश तोरस्कर मंडळचे माजी अध्यक्ष दासानंद स्वामी महाराज दर गुरुवारी प्रवचनाचा कार्यक्रम मी घेईन. नक्कीच लोकांच्या वागण्यात प्रचिती येईल असा ठाम विश्वास आहे हे साई सेवा निरंतर चालली पाहिजे असे मत तोरस्कर यांनी मांडले. मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र दळवी (उपाध्यक्ष) म्हणाले की आपण गेली २५ वर्ष या मंडळाच्या माध्यमातून काम करत आहोत हे काम निरंतर चालले पाहिजे. आपण सर्व लोक आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment