Monday, 8 November 2021

म्हारळ गावातील माजी सभापतींच्या घरावर धाडसी दरोडा, लोखोंची लूट, पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह ?

म्हारळ गावातील माजी सभापतींच्या घरावर धाडसी दरोडा, लोखोंची लूट, पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह ?


कल्याण, (संजय कांबळे) : अंत्यत गजबजलेल्या अशा लोकवस्तीच्या ठिकाणी राहतअसलेल्या कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती सौ रंजना केतन देशमुख यांच्या घरावर चोरट्यांनी अंत्यत धाडसी दरोडा टाकला. तर ते ऐवढयावरच न थांबता परिसरातील अनेक भागात लुटालूट करून लाखोंचा ऐवज व रोखड लुटून नेली. विशेष म्हणजे म्हारळगावात वांरवार अशा घटना घडत असल्याने पोलिसांंच्या कार्यक्षेमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याबाबत दस्तुरखुद्द ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ गाव हे दिवसेंदिवस गुन्हेगारांचे माहेरघर होते की काय? अशी भिती सध्या व्यक्त होत आहे. लाखोंच्या वर लोकसंख्या असलेल्या या गावात मारामारी, हाणामाऱ्या, लुटालूट, गाड्या फोडणे, दहशत माजवणे, असे प्रकार आता नित्याचेच झाले आहे. गावापासून काही मिटर अंतरावर पोलीस चौकी आहे, परंतु आम्ही काय करणार,? आम्ही इन मीन तीन अशी उत्तरे ठरलेली ऐकायला मिळतात. ते काही अंंशी खरेही आहे, मराठी, हिंदी चित्रपटात एक डाँयलाँग वांरवार ऐकायला मिळतो,तो म्हणजे, अगर पोलिसांनी ठरवले तर मंदिरातील चप्पल देखील चोरी होऊ शकत नाही. पण हे प्रत्यक्षात कदापि शक्य नाही, कारण येथे पोलीस च सुरक्षित नसेल तर आम जनतेचे काय? अशा वेळी जनतेचा, नागरीकांचा,राजकारण्यांचा पोलिसांना पठिंबा, साथ मिळायला हवी, व तसा विश्वास पोलिसांनी देखील निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु येथे चित्र उलटे दिसत आहे,


किती दिवस अपुऱ्या पोलीस बळाचे तुणतुणे वाजवत बसणार? याचाच गैरफायदा हे गुन्हेगार मंडळी घेत असून यातून गुन्हेगारी वाढली आहे. खून, बलात्कार, फुस लाऊन पळवून नेणे, हाफमर्डर, दहशत माजवणे, दरोडे, लुटालूट असे सुरुच आहे, कालच कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती रंजना केतन देशमुख यांच्या घरी पहाटे चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला, सभापतीचे हे घर अंत्यत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आहे, ४ जणांच्या टोळीने घरात प्रवेश करून सभापतीच्या सासूबाई श्रीमती कमल देशमुख यांच्या खोलीत घुसून त्यांच्या कानातील, कर्णफुले, ओरबाडून नेले,याशिवाय आणासाहेब पाटील नगर, साईदिप काँलनी क्रांती नगर, गणेशनगर आदी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून दागिने, रोखड लुटून नेली, हे सर्व चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच म्हारळ ग्रामपंचायत परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांची गावगुडांकडून तूफान तोडफोड झाली होती. म्हारळ शाळेची चोरी तर चोरट्यांचा धंदाच बनला आहे, दहशत माजवणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे यांना पोलिसांचा धाक,वचक राहिला आहे का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर येथील कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून सर्व पक्षीय पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे काही नी बोलून दाखविले. तसेच म्हारळ गावातील वाढत्या गुन्हेगारी विषयी आमदार, खासदार, व अनेक लोकप्रतिनिधीनी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या कडे तक्रारी केल्या असल्याचे समजते, तर पोलीस अधीक्षक महाशयांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी राजू वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

*म्हारळ, वरप,कांबा या परिसरातील गुन्हेगारी रोखायची असेल तर ग्रामस्थांची मदत महत्त्वाची!-

उल्हासनगर शहरा नजीक व कल्याण नगर मार्गावर वसलेल्या या तिन्ही गावाचे झपाट्याने नागरिकरन झाले आहे. कोणी कुठेही चाळी बांधल्याने आपल्या आजूबाजूला कोण राहतो, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. त्यातच लाखांच्या वर लोकसंख्या आणि ४/५ पोलीस कुठे लक्ष देणार,? हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे अशा वेळी पोलिसांनी पुढाकार घेऊन, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांच्या मदतीने गावात ग्राम सुरक्षा दल, निर्माण केले, यामध्ये तरुण मंडळी, महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, जागृत नागरिक, यांचे राजकारण विरहीत पथक निर्माण केले, प्रत्येक भागात सीसीटीव्ही कॅमेरे  सक्तीचे केले, गस्त वाढवली, तर आपोआपच गुन्हेगारी आटोक्यात येईल. याकरिता नागरिकांनी देखील खंबीरपणे सहभाग घेतला पाहिजे. यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल, व वाढणारी गुन्हेगारी आटोक्यात येईल.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...