Monday 20 December 2021

भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आलिमघर खाडी किनाऱ्यावरील गावठी हात भट्ट्या व रसायन केले नष्ट !!

भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आलिमघर खाडी किनाऱ्यावरील गावठी हात भट्ट्या व रसायन केले नष्ट !!


 भिवंडी, दिं,20, अरुण पाटील (कोपर) :
         भिवंडी तालुक्यातील गाव खाडी किनारी गावठी हातभट्टी दारूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. तालुक्यातील काल्हेर खाडी, केवणी -दिवे खाडी, कालवार खाडी, खारबाव खाडी, या ठिकाणी देखील गावठी हातभट्टी दारूची निर्मिती होत असते, ही दारू नंतर ठाणे जिल्ह्यात वितरित केली जाते. काही दिवसांनी 31 डिसेंबर येणार असल्याने गावठी हातभट्टी माफियांनी हात भट्ट्या जोरात सुरु केल्या आहेत.
        त्या पैकी आलिमघरगाव येथील खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारूचे उत्पादन  करणार असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ यांना मिळाली असता हे गावठी हातभट्टी माफियांचे कर्दनकाळ ठरले असून त्यांनी सदर ठिकाणी असलेल्या सर्व हातभट्ट्या नष्ट करण्याचे आदेश दिले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, पोलीस हवालदार बोडके, पो.ह. नवले, पो.ना. सुनील शिंदे, पो.शि. सावंत यांनी आपल्या पथकासह बोटीने खाडी पात्रातून सदर ठिकाणी धाड मारून ड्रममध्ये साठवलेले  हजारो रुपये किमतीचे हातभट्टीचे रसायन व हातभट्ट्या नष्ट करून 3 लाख 86 हजरांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात  चौघानं विरोधात गुन्हा दाखल केल्याने अवैध गावठी हातभट्टी दारू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले  आहेत.
         नारपोली पोलीसानी या गुन्ह्यांत अविनाश पाटील (रा. अलिमघर, ता. भिवंडी) दिलीप सोनू पाटील, योगेश नारायण पाटील (दोघे रा. अंजूर गाव) आणि मनोहर सखाराम पाटील (रा.अंजूर, ता. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
             गावठी हातभट्टी दारू स्वस्त व लगेच नशा आणणारी असल्याने तळीरामांची ओढ गावठी हातभट्टी दारूकडे जास्त असते. यामुळे ग्रामीण भागातील खाडी किनाऱ्यावरील कांदळवनात मोठ्या प्रमाणात दारू माफियां हातभट्ट्या लावून दारूची निर्मिती करत आहेत. पोलीस पथकाने घटनास्थळी पंचानाम करत सुमारे तिन तासाच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणच्या गावठी हातभट्टीसाठी लागणारे प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये असलेला रसायन नष्ट केले.

No comments:

Post a Comment

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !!

कल्याण पश्चिम महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांचा शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल !! कल्याण, सचिन बुटाला : राज्या...