कोरोनाने वाढवली महाराष्ट्राची चिंता ! रविवारी कोरोनाबाधितांचा आकडा १६०० पार तर मिळाले ३१ ओमिक्रॉन बाधित रुग्ण !!
राज्यात सध्याच्या घडीला 9,813 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रविवारी 918 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12% एवढा आहे. राज्यात सध्या 89,251 रुग्ण हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई २७, ठाणे २, पुणे ग्रामीण १, अकोला येथे १ रुग्ण आढळून आला आहे.

No comments:
Post a Comment