Wednesday, 5 January 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'भारत सेवा रत्न गोल्ड मेडल 2022 पुरस्काराने ललिता मोरे या सन्मानित.!!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'भारत सेवा रत्न गोल्ड मेडल 2022  पुरस्काराने ललिता मोरे या सन्मानित.!!


मुंबई, हेमंत रोकडे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन उडीसा राज्य तर्फे आर एस पी अधिकारी युनिट कमांडर मनिलाल शिंपी (ब्रँड अँबेसिडर डायरेक्टर ऑफ महाराष्ट्र) यांच्या वतीने गणेश विद्या मंदिर शाळेतील शिक्षिका ललिता मोरे यांना"भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड 2021,""देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


पुरस्कारसमयी RSP कमांडर मणिलाल शिंपी, स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, उदार अन्नदाते डॉ.दिनेश ठक्कर, संध्या माध्यमिक विद्यालयाचे अरविंद देवरे ,तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका छाया शिंपी, ज्येष्ठ शिक्षिका स्मिता सोंजे  ,रंजना पाटील ,रिता मिस्त्री या ज्येष्ठ शिक्षकांच्या व इतर शिक्षक सहकारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत छाया शिंपी यांनी ललिता मोरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आणि पुरस्काराचे मानपत्र  आर एस पी कमांडर मणीलाल शिंपी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पाटील यांनी केले.


No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...