Thursday, 6 January 2022

आपल्या अंतरात्म्याचा अनुभव आपण 2022 मध्ये करूया ! - संत राजिन्दर सिंह जी महाराज

आपल्या अंतरात्म्याचा अनुभव आपण 2022 मध्ये करूया ! -  संत राजिन्दर सिंह जी महाराज


सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी नववर्ष 2022 च्या आगमना निमित्त शिकागो, अमेरिकेहून युट्युब वर लाईव्ह टेलिकास्ट द्वारे संपूर्ण मानव जातीला आशा, शांती आणि ध्यान-अभ्यासाचा विश्व कल्याणकारी संदेश दिला.

नववर्ष 2022 च्या आगमना प्रसंगी संपूर्ण विश्वाला शुभकामना देताना संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी महामारी च्या या दुःखद समयीसुद्धा शांती प्राप्त करण्यासाठी या नववर्षाकरिता आपले अध्यात्मिक घोषवाक्य प्रस्तुत केले, "आपल्या अंतरात्म्याचा अनुभव आपण 2022 मध्ये करूया". नववर्षाच्या प्रसंगी त्यांनी समस्त मानव जाती करिता प्रार्थना केली की, या नवीन वर्षात आपले सर्वांचे जीवन आंतरिक शांति, खुशी आणि आनंदाने भरून जावे.

या ऑनलाईन कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूजनीय माता रीटाजी यांनी गुरुवाणीतील गुरू अर्जन देव जी महाराजांच्या वाणी चे, "मांगू राम ते इक दान" गायन केले. त्यानंतर संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी आपल्या प्रवचनात म्हटले की,  मागील दोन वर्षांपासून संपूर्ण मानवजात महामारी च्या या कठीण प्रसंगातून जात आहे. माझी हीच प्रार्थना आहे की, येणाऱ्या नवीन वर्षात आपले सर्वांचे जीवन चांगले व्हावे.  आपल्या नववर्षाच्या संदेशा करिता, "आपल्या अंतरात्म्याचा अनुभव आपण 2022 मध्ये करू या" च्या विषयी त्यांनी असे सांगितले की, हे घोषवाक्य खऱ्या आनंदा च्या प्राप्तीकरिता सहाय्यक ठरेल. अंतरात्म्याचा हा अनुभव प्रत्येक मनुष्य भले, तो कोणीही असो, कुठेही राहात असो किंवा  त्याची परिस्थिती कशीही असो, याद्वारे तो आपल्या जीवनाला योग्य बनवू शकतो.

त्यांनी पुढे असे म्हटले की बहुतांश आपण आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक समस्यांचा सामना करतो आणि त्यांना दूर करण्याकरिता प्रयत्न सुद्धा करतो. परंतु जर आपण लक्ष देऊन पाहिले तर  आपण केवळ आपल्या बाह्य पैलूंना बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हे समजले पाहिजे की, आपल्या जवळ आणखी पर्याय आहे, ज्या कडे आपण लक्ष देऊ शकतो आणि ते म्हणजे आपल्या अंतरात्म्याकडे पाहणे. जो अंतरात्मा शाश्वत, सदैव, चिरंतन राहणारा आहे. हा आपल्या जीवनातील चढ-उतारांशी संबंध ठेवत नाही तर, स्थाई आनंदाचा स्रोत आहे. याचा अनुभव करून आपण शाश्वत आनंद आणि शांती प्राप्त करू शकतो. आपण या अनुभवाला आपल्या अंतरी कसे प्राप्त करू शकू?

महाराजांनी पुढे असे म्हटले की, ध्यान-अभ्यास एक अशी सहज सरळ पद्धत आहे, ज्याद्वारे आपण आपल्या अंतरात्म्याशी संपर्क करून, आपल्या अंतरातील गुप्त खजिन्यांना  प्राप्त करू शकतो. या अनुभवाच्या प्राप्तीने आपणास समज येते की, खरा प्रकाश, आनंद आणि शांती कुठे बाहेर नाही तर आपल्या अंतरीच आहे. जसजसे आपण आपल्या अंतरी प्रभूच्या दिव्य अनुभवाशी जोडले जातो तर तस-तसा तो अनुभव आपणांस आतून सततच्या आनंदाने ओतप्रोत करतो, याद्वारे आपले पूर्ण जीवनच बदलून जाईल.

चला तर, जेव्हा आपण नववर्ष 2022 मध्ये प्रवेश करीत आहोत तर आपण दररोज आपला वेळ ध्यान-अभ्यासामध्ये व्यतीत करूया आणि आपल्या अंतरात्म्याचा अनुभव आपण 2022 मध्ये करूया.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2


अमृता : +91 84510 93275

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...