Thursday, 6 January 2022

जिल्ह्यातील तरुणांना उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी प्रयत्न करणार - चेतन दळवी

जिल्ह्यातील तरुणांना उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी प्रयत्न करणार - चेतन दळवी


 कोकण, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
             निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या कोकणामध्द्ये असे अनेक सुशिक्षित तरुण आहेत की ते नोकरीसाठी मुंबईची वाट धरतात. निसर्गाने कोकणाला भरभरून दिलेलं असताना सुद्धा अपुऱ्या मार्गदर्शनामुळे उद्योग व्यवसायाकडे येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत आज कोकणामध्ये आंबा, काजू, मच्छी, कोकम, डेरी व्यवसाय असे अनेक व्यवसाय बँकेच्या अर्तसहाय्याने करण्यासारखे आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस या नात्याने प्रथम प्राधान्य मी कोकणातील तरुणांना या व्यवसायाकडे येण्यासाठी देणार आहे. येत्या काही कालावधी मध्ये शासनाच्या कोरोनाच्या अटी शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील तरुणांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबिर घेण्याचा मानस राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...