पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारिता एकता फौंडेशन तर्फे पत्रकारांचा गुणगौरव !!
कल्याण, हेमंत रोकडे : पत्रकार दिनाच्या निमित्ताने *पत्रकारिता एकता फौंडेशन* कडोमपा क्षेत्र या संस्थेतर्फे पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकार राजलक्ष्मी पुजारी आणि किरण सोनावणे यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश मुथा (सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अध्यक्ष शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक संस्था) उपस्थित होते. तसेच समाजसेवक आर एम यादव, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीप देसाई, अचिव्हर्स महाविद्यालयाचे अध्यक्ष भिवंडीकर हे देखील उपस्थित होते.
प्रकाश मुथा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की देश स्वतंत्र होण्या आधी स्व. बाळकृष्ण जांभुळकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र प्रकाशित केले होते. त्यात जनतेचा दडपलेला आवाज त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला तसेच स्वातंत्र्य लढ्यात जनजागृती करण्यासाठी त्याचा वापर केला. पत्रकार हा समाजाचा दिपक असून लोकशाही चा चौथा स्तंभ आहे.
निष्पक्षपातीपणे आज पत्रकारिता होत नाही कारण जर त्यांनी तसे केले तर त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होतो आणि खटले दाखल केले जातात ही खंत त्यांनी बोलून दाखवली. या वेळी अनेक पत्रकार, समाजसेवक राजकिय मान्यवर उपस्थित होते.



No comments:
Post a Comment