Thursday, 6 January 2022

पद्मश्री सिंधुताई सपकाळ या ममतेच्या सागर होत्या; त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य शासनाने पुरस्कार सुरू करावा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

पद्मश्री सिंधुताई सपकाळ या ममतेच्या सागर होत्या; त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य शासनाने पुरस्कार सुरू करावा - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि.6, हेमंत रोकडे - अनाथांची माता पद्मश्री  सिंधुताई सपकाळ या ममतेच्या सागर होत्या.त्यांच्या निधनाने महाराष्ट्र नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. माता सिंधुताई सपकाळ या स्त्रीशक्तीच्या प्रतीक होत्या. त्यांचे जीवन हे संघर्षमय राहिले आहे. मूर्तिमंत ममत्व आणि संघर्षातून फुललेले कर्तृत्व यामुळे पद्मश्री सिंधुताई या महिलांच्या आदर्श ठरल्या असुन दिवंगत सिंधुताई सपकाळ यांचे राज्य शासनाने स्मारक  बांधावे तसेच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 

दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्य आयुष्यात प्रचंड दुःख दैन्य सहन केले. त्यांनी हिंमतीने संकटांचा सामना केला.संघर्षमय त्यांचे जीवन राहिले. संकटांचा सामना करीत त्या तावून सुलाखून निघाल्या. त्यांनी अनाथ मुलांचा ममतेने सांभाळ करून अनेकांना घडविले. निराधार स्त्री म्हणून त्यांनी स्वतःला कमजोर समजले नाही तर त्यांनी हिंमतीने अनेकांना आधार दिला. निराधारांना आधार देणाऱ्या त्या आधारस्तंभ झाल्या. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकार ने सिंधुताईंचा गौरव पद्मश्री पुरस्काराने करण्यात आला आहे. वात्सल्यसिंधू दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्य सरकारने महिला सक्षमीकरण क्षेत्रात पुरस्कार सुरू केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ना.रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...