Thursday, 6 January 2022

रिलायन्स जीओ कडून मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी रू.16.53 कोटी रक्कम महापालिका तिजोरीत जमा !

रिलायन्स जीओ कडून मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी रू.16.53 कोटी रक्कम महापालिका तिजोरीत जमा !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून रिलायन्स जिओ कंपनीच्या नव्याने कर निर्धारण करण्यात आलेल्या 99 मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी, रक्कम रू.16.53 कोटीचे धनाकर्ष महापालिकेच्या तिजोरीत जमा करणे कामी रिलायन्स जिओचे मॅनेजर यांनी मे.सुमन इन्फ्रा सर्व्हिसेस यांच्या माध्यमाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचेकडे सूपूर्द केले. सदर वसूली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली कर संकलन व निर्धारण विभागाचे प्र. उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी केली असून यावर्षीचे मालमत्ता कर वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यसाठी कठोर कारवाईचा अवलंब करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

तरी महापालिकेच्या सर्व करदात्यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मिळकतीचा मालमत्ता कर विहित वेळेत महापालिकेत जमा करून महापालिकेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...