Tuesday, 4 January 2022

ठाण्यात 22 कोटीच्या टॅक्स चोरी प्रकरणी वडिलांसह मुलाला बेड्या.!!

ठाण्यात 22 कोटीच्या टॅक्स चोरी प्रकरणी वडिलांसह मुलाला बेड्या.!!


भिवंडी, दिं,4, अरुण पाटील (कोपर) :
            मुंबई झोनच्या ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 22 कोटी रुपयांचे जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन ​​यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत अधिकाऱ्यांनी या प्रकरणी वडिलांसह  मुलाला बेड्या ठोकन्यात आल्या आहेत.
               मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन वेगळ्या फर्मचे ॲाफिस कांदिवली पश्चिम, मुंबई येथे आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहेत. 11.80 कोटी रुपये आणि 10.23 कोटी रुपयांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेउन त्यांना मंजूर करण्याच्या प्रक्रियेत या व्यक्ती गुंतल्या होत्या. सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट हे बनावट संस्थांकडून मिळवून ईतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या.
               या दोघांना सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132 (1) (b) आणि (c) चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
                  प्रामाणिक करदात्यांना अनुचित स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई झोनने ही कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम विभाग अधिक तीव्र करणार आहे अशी माहिती ठाणे आयुक्तालयाचे सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...