Tuesday, 4 January 2022

कल्याण पूर्वेतील साई नगरातील जाईबाई शाळा ते नारायण पार्क रस्त्याचे भूमी पूजन !!

कल्याण पूर्वेतील साई नगरातील जाईबाई शाळा ते नारायण पार्क रस्त्याचे भूमी पूजन !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे नगरसेवक माजी महापौर रमेश जाधव यांच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिका मार्फत मागासवर्गीय निधीतून कल्याण पूर्वेतील साई नगरातील जाईबाई शाळा ते नारायण पार्क हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे या महत्त्वाकांक्षी कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते झाले. 


खराब रस्त्यामुळे स्थानिक नागरिक नाराज झाले होते. विशेषत: पावसाळ्यात येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. लोकांची अडचण पाहून शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश जाधव यांनी महापालिकेच्या दलित वस्ती कोट्यातून रस्ता बांधकामासाठी २० लाखाचा निधी मिळवून दिला. मंगळवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले या वेळी शरद पाटिल, सौ. रेखा जाधव, सौ. शोभा पावशे शाखा प्रमुख- प्रमाद परब, महिला शाखा संघटक सौ. कांचन दूमणे, अमित पाटिल, कृष्ण सालुंके उपस्तीत होते.


No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...