Tuesday, 4 January 2022

"व्यर्थ न हो बलिदान" भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीर रत्ने हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन !!

"व्यर्थ न हो बलिदान" भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीर रत्ने हुतात्मा भाई कोतवाल व  हुतात्मा हिराजी पाटील यांना विनम्र अभिवादन !!


कल्याण, हेमंत रोकडे : देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांविरुद्ध मोठी चळवळ उभी करून या क्रांतिकारकांनी आझाद दस्त्याची स्थापना केली. या संघटनेची ब्रिटिशांनी मोठी धास्ती घेतली होती व या संघटनेतील सदस्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी इनाम लावले होते, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे मुक्कामास असताना ब्रिटिशांनी मोठ्या फौजफाट्यासह आझाद रस्त्यातील शिलेदारांवर हल्ला केला यात भाई कोतवाल व हिराजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी वीर मरण पत्करावे लागले. यावर्षी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. 


या कार्यक्रमास कपिल पाटील (केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री), एकनाथ शिंदे (ठाणे जिल्हा पालकमंत्री व नगरविकास मंत्री) किसन कथोरे (मुरबाड आमदार), सुभाष पवार, प्रमोद हिंदुराव, जयवंत सूर्यराव व इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रांतिवीरांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे दीपप्रज्वलन ही करण्यात आले. दरवर्षी १ व २ जानेवारी या दिवशी सिद्धगडावर शहीद दिवस साजरा केला जातो. यासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व स्तरातील मान्यवर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित असतात.

या कार्यक्रमावेळी ठाणे व रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून क्रांतीज्योतीचे आयोजन करण्यात येते यात सिद्धगडाच्या पायथ्याशीच वसलेल्या  डोंगरन्हावे गावातून सुद्धा दरवर्षी क्रांतीज्योतीचे प्रस्थान केले जाते, सर्वप्रथम संपूर्ण गावामध्ये क्रांतीज्योत फिरवली जाते व रात्री सिद्धगड कडे प्रस्थान केले जाते. क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ "क्रांतिवीर चषक" या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सुद्धा या गावात केले जाते.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...