Wednesday, 5 January 2022

"क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले" जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना केले सन्मानित !! 'अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ संपन्न'...

"क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले" जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना केले सन्मानित !!

'अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ संपन्न'... 


नाशिक, बातमीदार :  सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक मान्यवरांचा "राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार" देवुन सन्मान करण्यात आला. "ज्ञानाई क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले" यांच्या जयंतीनिमित्त *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य* या सामाजिक संघटनेच्या वतिने हाॅटेल बालाजी जवुळके, नाशिक या ठिकाणी फेटा शाल गुलाबगुच्छ स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक मान्यवरांना संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक- अध्यक्ष  *रविंद्रदादा जाधव* यांनी भुषविले होते. 


या प्रसंगी विचारपीठावर अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत* आनिस प्रदेश उपाध्यक्षा *प्रा.प्रेमलताताई जाधव, वसंतराव वाघ,*  उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष *प्रदीपनाना गागुर्डे,* निमंत्रक *प्रशांत ढेंगळे* उ. महा. कार्याध्यक्षा वैशाली जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. विचार पिठावरील पाहुण्यांचा परिचय दिंडोरी तालुका युवाध्यक्ष रविभाऊ भिमराव बागुल यांनी करुन दिला. पाहुण्यांचा शाल गुलाबगुच्छ यथोचित सत्कार स्थानिक पदाधिका-यांमार्फत करण्यात आला.


प्रास्ताविक उ.महा. कार्याध्यक्षा वैशालीताई जाधव यांनी केले.


सांस्कृतिक कार्यक्रमात "हम सब एक है" (सर्व धर्म समभाव) ही राष्ट्रीय एकात्मतेवर लघु नाटीका रफीक सैयद व त्यांच्या टीमने सादर केली तर कु. रुपाली परदेशी हीने नृत्याविष्कार सादर केला विशाल पांडव, मनिषा पवार, सुनिल एकारसर, परवीन बागवान यांनी गीतगायन करुन कार्यक्रमात रंगत आणली. 


या वेळी पुरस्कारर्थींच्या वतिने साहेबराव नंदन, दिपाली मोरे, वाळेकर, निरजा आंबेरकर, भाग्यलता शुक्ला, ॲड. सोमदत्त मुंजवाडकर आदींनी संघटनेच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढुन धन्यवाद व्यक्त केले. 

या वेळी पुरस्काररार्थी मध्ये सर्वश्री श्री.साहेबराव आनंदराव नंदन (नाशिक), डाॅ. कीशोर पुंजाजी भालेराव (नाशिक), श्री.बाळासाहेब आंतुल लोंढे (अंध - KV मुख्याध्यापक, नाशिक), श्रीमती.दिपाली केशव मोरे, (उपशिक्षीका, ईगतपुरी), एँड.सोमदत्त वसंतराव मुंजवाडकर (उपशिक्षक, सटाणा), छाया नामदेव माळी (उपशिक्षीका, नाशिक),  दीपाली खेडकर (नायब तहसीलदार), ॲड. सिमाताई जाधव (जळगांव), भारती तुकाराम जोंधळे (सरपंच, जवुळके), नवाज शहा (सामाजिक, कोपरगांव), राजेंद्र तुकाराम गांगुर्डे (नांदगाव), निरजा आंबेरकर (बदलापूर), शंकरराव नथुजी गांगुर्डे (दिंडोरी), अशोक तुकाराम गांगुर्डे (पिंपळगांव बं.), सुरेश गोविंद वाळेकर (उरळीकंचन, पुणे), राजाभाऊ गांगुर्डे (पोलीस हवालदार, नाशिक), सरोज गाजरे (मुख्याध्यापीका HAL), दिगंबर वाघ (ओझर), हरिश चौबे (पाथर्डी फाटा, नाशिक), योगेश गोसावी (पत्रकार,नाशिक), श्रीमती योजनाताई भगत (पाथर्डी फाटा, नाशिक),रविंद्र तुकाराम देवरे (नाशिक), भाग्यलता विजय शुक्ला (धुळे) आदींना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते *क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य स्तरीय पुरस्कार* देवुन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुत्रासंचालन सुनिल एकार सर यांनी केले तर आभार मनोजभाऊ पांडव यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्षा मनिषाताई पवार, निफाड तालुकाध्यक्ष शशीभाऊ जाधव, शिलाताई जाधव, नाशिक शहराध्यक्ष राधाताई क्षिरसागर, टीकुभाई कोहली, हनुवंत गायकवाड, ज्योती काजळे, सरला जंगले, संदीप साबळे, रेखाताई जाधव, कोमल जाधव, निर्मला गायकवाड, राहुल जगताप, किरण गवळे, सरिता परदेशी, सुनिता वाघ, परवीन बागवान, आदी. पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविभाऊ बागुल, प्रविण पांडव, राज जाधव, कृणाल जाधव, सागर जाधव, अरविंद जोंधळे, सागर जगताप आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...