Wednesday, 5 January 2022

अखेर २५ दिवसांनी कल्याण मध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल !! "धार्मिक भावना भडकविणे, दंगा घडवून आणण्यासाठी बेछूट चिथावणी देणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा"

अखेर २५ दिवसांनी कल्याण मध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल !!

"धार्मिक भावना भडकविणे, दंगा घडवून आणण्यासाठी बेछूट चिथावणी देणे आदी कलमा अंतर्गत गुन्हा"


कल्याण / हेमंत रोकडे : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्या विरोधात कलम २९५ अ धर्माच्या आणि धार्मिक श्रद्धांचा अपमान करणे, कलाम २९८ धार्मिक भावना दुखविण्या बाबत बोलणे, कलाम १५३ दंगा घडवून आणण्या साठी बेछूट चिथावणी देने. ५०५ ब सार्वजनिक आगळीक होण्यास साधक विधाने करणे आदी गंभीर कलमा खाली गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे त्यांच्या सहकार्यानी या बाबत कोळसेवाडी पोलिस स्थानकात पत्र देऊन तक्रार दाखल केली होती.


या कार्यक्रमा साठी पोलिसांनी परवानगी दिली नसताना शिवप्रताप या संघटनेने कल्याण पूर्व येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साकेत कॉलेज येथे झालेल्या या कारकार्यक्रमात पोलिसांचे आदेश डावलून त्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, साथ रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून कोळसेवाडी पोलिसांनी आयोजकांवर या आधीच  गुन्हा दाखल केलेला आहे.


महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली, पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा कल्याणच्या कार्यक्रमातील आणखी काही व्हीडिओ आता समोर आले आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण याच कालीचरण महाराज यांनी कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस स्थानकच्या हद्दीतील साकेत कॉलेज येथे दिनांक १० डिसेंबर रोजी दोन  धर्मात तेढ निर्माण होईल असे  भाषण केले होते.या बरोबर महात्मा गांधी पंडित नेहरू यांच्या बद्दल अनुउदगार काढले होते. या प्रकरणी नोवेल साळवे यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दोन दिवसा पूर्वी तक्रार दाखल केली होती. या मुळे अखेर २५ दिवसानंतर या कालीचरण महाराज याच्या वर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांना मिळालेल्या तक्रारीहून गुन्हा दाखल केल्याने या कालीचरण महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

या कोळसेवाडी पोलिसांना लिहिलेल्या पात्रात कालीचरण महाराज काय काय म्हणाले या बाबत नोवेल साळवे यांनी म्हटले आहे की हे कालीचरण महाराज म्हणतात भारतमाता म्हणजे काय? नकाशावर दिसणारा भूभाग म्हणजे भारतमाता ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. भारतमाताच का म्हणतो आपण? १०० करोड हिंदू लोकं जे हिंदुस्तानात राहतात ते भारतमाता आहेत. कारण की, १०० कोटी हिंदू लोकांचा समूह म्हणजे भारतमाता. ख्रिश्चन किंवा मुसलमान हे कधीच भारतमाता की जय म्हणणार नाहीत.' असे विधान करून या कालीचरण महाराजाने भारतीय घटनेची जी चौकट आहे तिला बाधा येईल असे वक्तव्य केले आहे.

भाषणात कालीचरण महाराज म्हणतात 'मग भारत काय आहे? शेंबड्यांनी सेक्युलर घोषित केला भारत. हरामखोर नेहरु आणि हरामखोर गांधी... पाकिस्तान आणि बांगलादेश मुसलमानांसाठी मुस्लिम देश म्हणून घेतला की नाही. 

या कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्या या बाबत नोवेल साळवे यांनी कोलेवाडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, कालीचरण महाराजांचे हे कल्याण मध्ये येऊन केलेले चिथावणीखोर भाषण हे दोन धर्मात तेढ निर्माण करून भविष्यात गृहयुद्ध भडकवणारे ठरू शकते.त्या मुळे अश्या देश तोडणारे भाषणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या मुळे कायद्याला अनुसरून शिक्षा झाल्यास कालीचरण सारख्या प्रवृतिला जबर बसेल म्हणून या बाबत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई  करून भारतीय संविधानातील मूल्य कशी जपली जातील हे पाहणे गरजेचे आहे. असे या बाबत नोवेल साळवे यांनी आपल्या पत्रात म्हटलेले आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...