Wednesday, 5 January 2022

कल्याण तालुक्यात कोरोना कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी हालचालीना वेग, रुग्ण वाढीचा वेग भयानक ?

कल्याण तालुक्यात कोरोना कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करण्यासाठी हालचालीना वेग, रुग्ण वाढीचा वेग भयानक ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत त्यांच्या साठी हक्काचे कोरोना कोव्हिड सेंटर असावे यासाठी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी जबरदस्त प्रयत्न करत असून कोरोना पेंशट भयानक वाढत असून त्यामुळे कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली ना वेग आला आहे, तर येत्या एक दोन दिवसात ते सुरु होईल असा विश्वास ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.


कल्याण तालुका हा अगदी उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ अश्या शहराजवळ असूनही मागील वर्षी कोरोनाच्या काळात तालुक्यातील नागरिकांना कोठेही बेड मिळत नव्हते, अनेकांना तर वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला होता. म्हारळ, वरप कांबा या परिसरात तर पेशंट तूफान वाढत होते. कल्याण पंचायत समिती व महसूल प्रशासन कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते, अनेक खाजगी शाळा व संस्था ना जागेसंदर्भात विचारना केली, पाहणी केली परंतु त्यांनी भितीपोटी दिली नाही. 


अखेर सदैव मदतीसाठी आघाडीवर असणाऱ्या वरप येथील 'राधा स्वामी सत्संग' यांनी जागा दिली व येथे कोव्हिड सेंटर सुरू झाले. दिड दोन वर्षाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोना आटोक्यात आला. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२१ रोजी वरप येथील राधास्वामी कोव्हिड सेंंटर बंद करण्यात आले. परंतु आता पुन्हा कोरोनाने वेगवेगळ्या रुपात डोके वर काढले आहे, डेल्टा, ओमायक्राँन अश्या या व्हिरियंन्टने राज्यात लाँकडाऊन ची स्थिती निर्माण केली आहे.


कल्याण तालुक्यात आज एकाच दिवशी तब्बल ९२ पेंशट सापडले आहेत. यातील ३२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये निळजे २९, नांदिवली १४, कोळे १२, गोलवली ५, म्हारळ ४, वरप २, खडवली ५, दानबाव, बेलकर पाडा १, वावेघर १, असे आहेत. त्यामुळे हा वेग लक्षात घेऊन तिसरी लाट आल्याचे हे संकेत माणून तालुक्यात कोरोना कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ, यांनी पाहणी सुरू केली. अशातच पुर्वीचे वरप येथील राधास्वामी कोरोना कोव्हिड सेँटर ची जागा न देण्याचा निर्णय काही संचालकांनी घेतल्याने मोठी अडचण निर्माण झाली. 


त्यामुळे त्यांनी म्हारळ, वरप, कांबा, रायते, मामणोली, आणेभिसोळ, आदी ठिकाणी जागा बघितल्या, परंतु तेथे काहीना काही अडचणी असल्याने तेथे सेंटर चालू करणे अवघड व खर्चिक आहे, असे असल्याने तूर्तास तरी वरप येथेच कोरोना कोव्हिड सेंटर सुरू होईल अशी आशा वाटते, या संदर्भात ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांना विचारले असता ते म्हणाले, येत्या दोन तीन दिवसांत कल्याण तालुक्यासाठी कोरोना कोव्हिड केअर सेंटर सुरू होईल असे सांगितले. तर राधास्वामी संत्सगचे संचालक राजेश लुल्ला यांना विचारले तर ते म्हणाले, आम्ही नेहमीच मदतीसाठी तयार असतो, मागील वर्षी आमच्या संस्थेने देशभरात बाराशे कोटी रुपयांची मदत केली असल्याचे सांगून याही वेळी नागरिकांची अडचण होऊ देणार नाही. असे सांगितले. त्यामुळे भविष्यात कल्याण तालुक्यातील लोकासाठी वरप येथे कोरोना कोव्हिड केअर सेंटर सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करुया, पण नागरिकांना गर्दी न करता, मास्क, सँनिटायझर, सोशलडिंस्टिंसन चे पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाळ यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...