Wednesday, 5 January 2022

शिपींग एजंटनेच 65 वर्षीय शिपींग एजंटचे केले अपहरण !! "मानपाडा पोलिसांनी एका शिपींग एजंटसह तिघांना केली अटक"

शिपींग एजंटनेच 65 वर्षीय शिपींग एजंटचे केले अपहरण !!
"मानपाडा पोलिसांनी एका शिपींग एजंटसह तिघांना केली अटक"


कल्याण, (ऋषिकेश चौधरी) : शिपींगमध्ये ज्या तरुणाना काम लागले होते. त्या तिघा तरुणांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने ते श्रीलंकेला जाऊ शकले नाही. ज्या एजंटने या तिघांच्या कामाची हमी घेतली होती. त्या एजंटकडून सर्व पैसे खर्च झाले. पैसे परत मिळविण्यासाठी दुसऱ्या एजंटने इतर दोन तरुणांसोबत शिपिंग एजंट बॅनर्जी याचे अपहरण केले. अखेर मानपाडा पोलिसांनी या 65 वर्षीय शिपींग एजंटची सुटका करीत तिघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. 


डोंबिवलीत राहणारे शुभाशिष बॅनर्जी हे शिपींग एजंट आहेत. त्यांना मनजीत यादव नावाच्या शिपींग एजंटने तीन तरुणाना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख रुपये दिले. 


बॅनर्जी याने या तिन तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा विजा तयार केला. यासाठी मनजीत याने दिलेले पैसे खर्च झाले. या तीन तरुणांची श्रीलंकेस जाण्यकरीता तारीख निश्चीत झाली. मात्र तिघांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने तिघांना क्वारंटाईन करण्यात आले. 15 दिवस क्वारंटाईन असल्याने व्हिजाची मुदत संपली. मनजीतकडून दिलेल्या पैशाचा तगादा लावण्यास सुरुवात झाला. बॅनर्जी याने स्पष्ट सांगितले की, सर्व पैसे खर्च झाले. मात्र मनजीत काही थांबला नाही. 


त्याने दोन साथीदारांसह धनंजय यादव आणि सोमप्रकाश यादव यांच्यासोबत बॅनर्जी यांचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच बॅनजी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. या दरम्यान मनजीत हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करुन पाच लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देत होता. इतकेच नाही तर अकाऊंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच मोबाईल लोकेशन द्वारे तपास सुरु झाला. नाला सोपारा येथील गोराई नाकाजवळील एका हॉटेलमधून बॅनर्जी यांची सुटका केली. पोलिसांनी मनजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तिघे आरोपी उत्तर प्रदेशात राहणारे आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...