त्यांचे बूट आणि कपडय़ाने फोडले लूटीचे बिंग
दहा चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केली अटक !!
कल्याण, ऋषिकेश चौधरी : गेल्या काही दिवसापासून डोंबिवलीत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. अखेर दोन चैन स्नॅचरला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे देाघे त्यांचे बूट आणि कपडय़ामुळे पकडले गेले आहे. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून 14 तोळे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
कल्याण डोंबिवली चैन स्नॅचिंगच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष करुन डोंबिवलीत अनेक गुन्हे घडले आहेत. या पाश्र्वभूमीवर कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी जे. डी. मोरे, सिनिअर पी आय शेखर बागडे यांनी आरोपीला शोधण्यासाठी पोलिस अधिकारी अविनाश वनवे आणि पोलिस अधिकारी सुरेश डांबरे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले.
या दोघा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास सुरु केला. पोलिसांनी ज्या भागात स्नॅचिंगचे गुन्हे घडले होते. त्या परिसरातील जवळपास ५८ सीसीटीव्ही तपासले. यात पोलिसांना दोन चोरटे एका बाईकवर दिसत होते. या चोरटय़ांनी गुन्ह्याच्या वेळी बूट आणि कपडे घातले होते. बहुतांश गुन्हयात तेच कपडे घातलेले दिसून आले. पोलिस या दोघांच्या शोधात होते. अचानक एका ठिकाणी पोलिसांना रस्त्यावरुन जात असताना त्याच प्रकारचे बूट आणि कपडे घातलेले दोन बाईक स्वार दिसले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. हेच ते दोघे होते. ज्यांना मानपाडा पोलिसांचे तपास पथक शोधत होते. मनोज ठाकूर आणि विकेश तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही उत्तरप्रदेशचे आहे. हे दोघे ठिकाणी काम करीत होते. लॉकडाऊनननंतर बेरोजगार झाल्यावर त्यांनी लूटीचा धंदा सुरु केला. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आणले असून 14 तोळे सोने हस्तगत केले आहेत.



No comments:
Post a Comment