Monday, 3 January 2022

सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !!

सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !!


जळगाव, बातमीदार : जळगाव येथील  शि. प्र.मंडळ संचलित सौ. सु.ग. देवकर  प्रायमरी स्कूल मध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  बालिका दिनानिमित्त मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महिला मुक्ती दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती मंगला सोनवणे  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून "सावित्रीच्या आम्ही लेकी" हे गीत सादर केले. सौ.किरण सैंदाणे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...