Monday, 3 January 2022

आपटी गावचे सुपूत्र डॉ रवींद्र शिसवे यांना केंद्रात महानिरीक्षक पदी बढती, महाराष्ट्रातून एकमेव नाव !!

आपटी गावचे सुपूत्र डॉ रवींद्र शिसवे यांना केंद्रात महानिरीक्षक पदी बढती, महाराष्ट्रातून एकमेव नाव !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या छोट्याश्या गावचे सुपूत्र डॉ. रवींद्र अंनता शिसवे यांची केंद्रात महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रातून ते एकमेव उच्च पदस्थ अधिकारी असून यामुळे ऐतिहासिक कल्याण च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


उल्हास नदीच्या काठावर आपटी हे छोटे गाव वसलेले आहे. गाव तसे मागास, शिक्षणाची सोय नसल्यामुळे याच गावातील अंनता शिसवे यांनी जबरदस्त जिद्द, चिकाटी, कष्ट याच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मँनेजर पदापर्यंत पोहचले, तर पत्नी सौ शुभांगी शिसवे या राजकारणातून कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान झाल्या, परिस्थितीवर मात करून हे यश मिळवल्यानंतर मोठा मुलगा रवींद्र शिसवे हा देखील भंयकर हुशार, बेळगाव मधून एमबीबीएस केल्यावर ते ठाणे जिल्ह्यातील डोळखांड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले, पण येथे त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी आयपीएस, आयएएस चा अभ्यास सुरू केली .व २००२ मध्ये ते महाराष्ट्रातून दुसरे आले. आयपीएस मध्ये निवड झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव होते.


सांगली जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून अशोक कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यानंतर गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली आदी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यावर ते पुणे शहराचे सह आयुक्त म्हणून रुजू झाले कोरोनाच्या संकट काळात अंत्यत प्रभावी पणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.


मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २००२ च्या तुकडीचे इंडियन पोलीस सव्हिस अधिकारी व अतिरिक्त आयुक्त पदावरील देशभरातल्या २३ अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून डॉ रवींद्र शिसवे यांचे एकमेव नाव आहे. त्यांना केंद्रात महानिरीक्षक (आयजी) आणि सहसचिव पदी पदोन्नती देण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कल्याण तालुक्यातील आपटी गावात आंनदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...