Tuesday, 4 January 2022

ओव्हल मैदानावर नामांकित क्रिकेट स्पर्धा संपन्न !

ओव्हल मैदानावर नामांकित क्रिकेट स्पर्धा संपन्न !


मुंबई, (दिपक मांडवकर / शांताराम गुडेकर) :

     नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयोजक श्री. महेंद्र जाधव यांनी ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा अतिशय छान पद्धतीने यशस्वी झाली. स्पर्धेत ३२ संघांनी सहभाग घेतला होता. तसेच ही स्पर्धा खेळाडूंना आकर्षित करणारी होती. सगळेच संघ विजेता होण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र या स्पर्धेत ४ संघ विजेते ठरले. प्रथम क्रमांक नानवली संघ, द्वितीय क्रमांक निगडी संघ, तर तृतिय क्रमांक गाणी संघ, चतुर्थ क्रमांक न्यु अंनतवाडी संघ यांना मान मिळाला. तसेच या ठिकाणी आक्रमक फलंदाज तसेच आदर्श खेळाडू पुरस्कार कु. अभिनव भुवड या खेळाडुला शाल व सन्मान पत्र देऊन सन्मान चिन्ह श्री.रामदास गावडे, महेंद्र जाधव, विजय कांबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...