भिवंडी शहरात कोरोना नियमांचे विसर ! पालिका व पोलीस प्रशासन यांचे सोयीस्कर दुर्लक्ष !!
भिवंडी, अरुण पाटील : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लावण्यास सुरवात केली. त्यानुसार दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी असताना भिवंडी शहरात कोरोना नियमावली कडे नागरीक सर्रास पणे दुर्लक्ष करीत तोंडावर मास्क न लावता सामाजिक अंतर न बाळगता वावरत आहेत.संपूर्ण भिवंडी शहरातील तिनबत्ती, धामणकर नाका, मंडई, शांतीनगर, गेबीनगर, नायगाव, गायत्रीनगर, इतर, जवळपास सर्वत्र भिवंडी शहरात कोरोनाच्या नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. तसेच दुकानदार स्वतः मास्क न लावता दिसून आले. बहुतेक फेरीवाले व दुकानात काम करणारे कर्मचारी ज्यांनी अद्यापही दोन डोस पूर्ण न केलेले आहेत. या शहरात राज्य शासनाच्या गाईडलाईन्सचा संपूर्ण धज्जा उडालेला दिसतो. अशा परिस्थितीत त्याला अटकाव करण्यसाठी पालिका व पोलीस प्रशासन यांचे सोयीस्कर दुर्लक्ष दिसून आले.


No comments:
Post a Comment