Friday, 14 January 2022

आरोग्यखाते कंत्राटी सफाई कामगारांची जिल्हा उप रुग्णालया समोर जोरदार निदर्शने ..!

आरोग्यखाते कंत्राटी सफाई कामगारांची जिल्हा उप रुग्णालया समोर जोरदार निदर्शने ..!


चोपडा, बातमीदार ...चोपडा येथील जिल्हा उप रुग्णालय, तसेच अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार यांनी चोपडा उप रुग्णालय समोर आज रोजी दुपारी १२ वाजता कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन यांचे नेतृत्वात जोरदार निदर्शने केली. व  त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांचा थकीत पगार अदा करावा अशी मागणी केली. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्व बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार आरोग्य खात्यातील सेवा कंत्राटदार अंतर्गत एक ते सात वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत, त्यात चोपडा जिल्हा उप रुग्णालय अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारीचा समावेश आहे. किमान वेतन कायद्यापेक्षा कमी वेतन बरोबर चोपड्यातील कर्मचाऱ्यांना ५/५ महिन्यांचे वेतन दिले नाही आणि २ महिन्यापूर्वी कामावरून कमी केले आहे या सर्व रुग्णालयीन कर्मचारी यांनी. कोविड 19 काळात जीव धोक्यात घालून काम केले पण त्यांना दोन महिन्यापूर्वी ठेकेदारांनी बंद केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, थकीत पगार द्यावा त्यांना आरोग्य खात्यात कायम करावे अशी मागन्यांसाठी जळगाव जिल्हा आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना आयटक ने आज जिल्हा रुग्णालयात समोर वाजता काळे मास्क घालून निदर्शने केली आहेत. या निदर्शनात  ऋषिकेश महाजन, निलेश माली, मयुर नेवे, राकेश नवल पाटील, मंगला साबळे, अशोक सोनवणे, रउफ मेहतर  यांनी भागीदारी केली. मेडिकल ऑफिसर डॉक्टर मनोज पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला असून केलेली कार्यवाही कळवतो म्हणुन सांगितले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...