Thursday, 13 January 2022

अनुसुचित जातीच्या कुटुंबावर समाजकंटकांनी केला होता प्राणघातक हल्ला..

अनुसुचित जातीच्या कुटुंबावर समाजकंटकांनी केला होता प्राणघातक हल्ला..


डोंबिवली, (प्रतिनिधी) - पिडीत व्यक्ती *दिलीप रामचंद्र साळवी* हे त्यांची पत्नी, मुलगा त्रिशांत, सुन व दोन नातवंडांसह टाटा पॉवर हाऊस, डोंबिवली पूर्व येथील जयमल्हार नगर झोपडपट्टीत राहतात. ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३०.वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा त्रिशांत याचे सोबत परिसरातील चंद्रकात घोडके, विशाल शेळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका भाईच्या सांगण्यावर वाद निर्माण केला. आणि मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
मानपाडा पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर पोलीस सबंधित भाईच्या सांगण्यावरून गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसतांनाही त्रिशांत याचा शोध घेण्यासाठी साळवी यांचे घरी मध्यरात्री आले. परंतु त्रिशांत घरी नव्हता.आपल्या मुलाची वाट बघत *पिडीत व्यक्ती दिलीप साळवी त्यांचे पत्नी सोबत* घराचे बाहेर बसले असतांना त्रिशांत सोबत ज्या मुलांचा वाद झाला होता ते बबलू, किशोर, संतोष गायकवाड आपल्या पंधरा वीस साथीदारांसह साळवी यांच्या घरात घुसले त्यांनी *तलवारीने दिलीप साळवी यांच्या डोक्यात घाव घातला* सोबत आलेल्या समाजकंटकांनी त्यांचे हातातील लाकडी दंडूक्याने व इतर लोखंडी हत्यारांनी हातावर पाठीवर बेदम मारहाण केली. *दिलीप साळवी याची पत्नी मध्ये सोडवण्यासाठी गेली असता तीला ही हातापाठीवर बेदम चोप दिला अंगावरचे वस्त्र फाडून अश्लील शिवीगाळ करून तीचा विनयभंग केला.* या वेळेस पहाटेचे सुमारे तीन वाजले होते.


पिडीतांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठले. *पोलिसांनी फक्त जखमी दिलिप साळवी यांनाच वैद्यकीय उपचारासाठी मेमो दिला.* त्यांच्या पत्नीलाही बेदम मारहाण झाली होती. परंतु कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तीची दखल घेतली नाही. दवा उपचार करुन आणल्या नंतर थातुर मातुर गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्ह्यात भादवि.संहितेचे कलम ३२४,३४, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५. सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम (३७)१ व १३५ अशी शुल्लक कलमांतर्गत गुन्हा नोंदवुन *आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असल्याचा आरोप पिडीत कुटुंबाने केला आहे.*

या बाबतची माहिती आरपीआय चे जेष्ठ नेते तथा राज्य उपाध्यक्ष *अण्णासाहेब रोकडे* यांना पिडीतांकडून मिळाल्या नंतर त्यांनी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेश-सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णा पंडित.* यांना घटनेची माहिती दिली. तेंव्हा पिडीतांना घेऊन अण्णासाहेब रोकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठले. सोबत अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित, अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे आर पी आय कल्याण डोंबिवली महीला जिल्हाध्यक्षा मीना साळवे आरपीआय जेष्ठ कार्यकर्त्या अर्चना कदम यांनी पिडीत कुटुंबासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्यातील एफआयआर मध्ये आरोपींना वाचवण्यासाठी अनेक त्रृटी ठेवण्यात आल्या आहेत योग्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हे वपोनी शेखर बागडे यांच्या निदर्शनास आणून दिले. सदर गुन्ह्यात दोन पिडीत व्यक्ती असतांनाही एकाचीच नोंद घेण्यात आली आहे. पिडीत कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालेला असतांनाही भादवि.संहितेचे कलम ३०७ लावण्यात आलेले नाही.

महीलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली तीचे वस्त्र फाडण्यात आले आहे परंतु तशी नोंद घेण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिडीत कुटूंब हे अनुसुचित जातीचे आहे. हल्लेखोर हे तेथील जवळपासच्या परीसरातील स्थानिक गुंड असुन ते गैर अनुसुचित जाती जमातीचे आहेत आणि ते पिडीत कुटुंबाला ओळखतात. त्यामुळे सदरचा गुन्हा अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत नोंदविण्यास आला पाहिजे होता परंतु पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी गुन्ह्याचे गांभीर्य कमी केले आहे मुळ आरोपींची नावे एफआयआर मध्ये घेतलेली नाहीत. अण्णा पंडीत यांनी सदरच्या बाबी वपोनी शेखर बागडे यांच्या निदर्शनास आणुन दिल्या आहेत.

पिडीतांचे पुरवणी जबाब घेऊन सदर गुन्ह्यात अॅट्रोसिटी सह भादवि. संहितेचे कलम ३०७, ३५४ व संघटीत गुन्हेगारीचे कलमवाढ करणेत येईल असे आश्वासन वपोनी शेखर बागडे यांनी शिष्टमंडळास दिले आहे. सदर शिष्टमंडळात आरपीआय राज्य उपाध्यक्ष *अण्णासाहेब रोकडे,* अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस *महेंद्र तथा अण्णा पंडित.* अन्याय अत्याचार निर्मुलन समिती अंबरनाथ तालुका अध्यक्षा *माया आहीरे,* आर पी आय कल्याण डोंबिवली महीला जिल्हाध्यक्षा *मीना साळवे,* आरपीआय जेष्ठ कार्यकर्त्या *अर्चना कदम* यांचे सह पिडीत कुटूंब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...