Wednesday, 12 January 2022

माहुली गडावर शिवदुर्ग प्रतिष्ठान ने काताळात गायब झालेले पाण्याची टाकी काढली शोधून, इतिहासकारांना संधी !!

माहुली गडावर शिवदुर्ग प्रतिष्ठान ने काताळात गायब झालेले पाण्याची टाकी काढली शोधून, इतिहासकारांना संधी !!


कल्याण, (संजय कांबळे) : शिवदुर्ग प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धक संस्थेने दिनांक ०९ जानेवारी २०२२ रोजी माहुलीगडावरील कल्याण दरवाजा व परीसर संवर्धन मोहीम आखली होती. या मोहीमेत कल्याण दरवाज्यात ज्या  पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते व भविष्यात ज्या पाण्याचा प्रवाहामुळे संपुर्ण दरवाज्याचेच अस्तित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता होती त्या पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी व दरवाज्याचा परीसर संवर्धन साठी खोदत असताना अचानक त्यांना काताळात गायब झालेली पाण्याची टाकी आढळून आली. त्यामुळे ही इतिहास कारांना अभ्यासासाठी संधी असल्याचे प्रतिष्ठानचे म्हणने आहे.


शिवदुर्ग प्रतिष्ठान नेहमी गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम व संवर्धन अशी कामे करत असते. 


या साठी शिवदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेचे स्थानिक सहकारी अतुल कापटे- माहुली यांच्या मदतीने संस्थेचे प्रथमेश प्रकाश चव्हाण, आनंद जाधव, प्रवीण झेंडे, मयुर जाधव, सुरज साळवी, प्रशांत शिवाजी गिते, संजय माने, प्रेम विमल प्रकाश महाले- वसई, सिद्धार्थ सुमन गुलाबराव बाविस्कर - वसई, समीर उल्हास भोईर (कल्याण), सिध्देश जाधव यांनी भिंवडी जवळील माहुली किल्ल्यावर पाण्याचा प्रवाह बदलण्यासाठी व दरवाजाचे संवर्धन करण्यासाठी मोहीम राबवली.

पहाटे ८ वाजेपासून संवर्धनाचे नियोजीत काम चालु केले. कल्याण दरवाज्याच्या डाव्या बाजुची भिंत व जवळील कातळ यांचे मधुन पाण्याचा प्रवाह वाहत जाईल अशा पद्धतीने कामाची सुरुवात केली, कल्याण दरवाज्याच्या भिंतीस प्रवाहीत होणारे पाण्यामुळे नुकसान होणार नाही अश्या पद्धतीने सर्व सदस्यांनी काम चालु केले. चर खोदत निघणारी माती व खडक यांची एक भिंत दरवाज्याच्या डाव्या मुख्य भिंतीस लागुन उभारणी चालु ठेवली होती, मोठ्या प्रमाणात व जोशपूर्ण काम चालु असतांना सदस्य पोवाडे, स्फुर्ती गीत गात होते. जसजसे वरच्या दिशेने आले तसतसे निघणाऱ्या मातीत ओलावा अधिकाधिक जानवत होता. जसे काताळाखाली पोचलो तसे माती उपसणे जड जात होते, साधारण दोन फुट माती काढली त्या खाली दगड व चुना आढळला व खाली चक्क भिंत होती सदर भिंत ही पाणी अडवून पाणी साठा होणेसाठी असावी असा कयास बांधुन संवर्धन करणारे हात हे पाहुन अधिक उत्साही झाले कामाचा वेग आपसुकच वाढला, साधारण दोन तीन फुट माती काढत असतांना हे पाण्याचे टाके आहे हे दिसुन आले.

मग काय सर्व सदस्य आनंदाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व माता जिजाऊ साहेब यांचे नावाचा जयघोष करुन संपुर्ण गड परीसर दणाणून सोडला. मुल नाचु लागली. प्रामाणिकपणा प्रयत्नांस गड पुरुषाचा आशिर्वाद मिळाला. कोण जाणे कित्येक वर्षे हे टाके सर्व भक्ष्यी काळाने या पाण्याच्या टाक्यास गडावरील मातीखाली गाडले होते. आज ते टाके मोकळे झाले. एक मोठे यश हाती आले. त्या मुळे अभ्यासकांसाठी आव्हान उभे ठाकले आहे. गडावरील गाडला गेलेला अपरिचित इतिहास कदाचित या मुळे समोर येईल व सर्वांना कळेलही. संस्थेचे प्रथमेश चव्हाण व सर्व सहभागी सदस्य यांच्या मते हे पाण्याचे टाके हे कल्याण दरवाज्यातुन येणार जाणारे व कल्याण दरवाज्यात पहारे नियुक्त सैन्य यांचेसाठी पाण्याची तजवीज म्हणून आहे. टाक्याचे आकारमान साधारण ७ फुट आडवे १० फुट उभे व समोरील बाजूस ३ फुट खोल व काताळाखाली दिड फुट असे आढळली.गडपुरुष यांच्या आशिर्वादामुळे जे यश मिळाले त्या आनंदात मोहीमेची सुरुवात सकाळी ८ ते संध्याकाळी ४ शा ८ तासाची गड संवर्धन मोहीम पुर्ण केली.भविष्यात या ठिकाणी व माहुलीगड, पळसगड, भांडारगड यांचेवर शिवदुर्ग प्रतिष्ठान या संस्थेकडुन अशाच संवर्धन, शोध मोहीम घेऊन आढळणारे अवशेष स्वच्छ व जतन करुन अभ्यास मोहीम करणार आहेत. शिवदुर्ग प्रतिष्ठान संस्था ही माहुलीगडावर कित्येक वर्षापासून अभ्यासपूर्ण संवर्धन मोहीमा करत आली आहे.

आजच्या या शोधामुळे इतिहासकारांना अभ्यासासाठी संधी मिळाली असल्याचे शिवदुर्ग प्रतिष्ठान चे प्रथमेश चव्हाण व इतर सदस्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...