Wednesday, 12 January 2022

केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कंमाडर पदासाठीच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव देशात १४ वी.... स्वराज्य प्रतिष्ठान लांजा, नितीश ऋषिणाथ पत्याने यांनी भेटून केले अभिनंदन..

केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कंमाडर पदासाठीच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव देशात १४ वी....

स्वराज्य प्रतिष्ठान लांजा, नितीश ऋषिणाथ पत्याने यांनी  भेटून केले अभिनंदन..


मुंबई, (शांताराम गुडेकर/दीपक मांडवकर) :

           केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कंमाडर पदासाठीच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव ही देशात १४ वी आली आहे.तर मुलींमध्ये ती पहिली आली आहे. भावना ही मुंबई दलातील सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांनी कन्या आहे. तर युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने ४ जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कामांडट पदासाठीच्या परीक्षेच्या निकाल जाहीर केला त्या वेळी देशभरातून १८७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत मिरारोडच्या शांती विद्या नगरी सोमोर न्यू ओम कॉम्प्लेक्स मध्ये राहणारी २८ वर्षीय भावना सुभाष यादव हिने देशात १४ वा क्रमांक मिळवला ही बातमी कळताच सर्वत्र शुभेच्छा वर्षावाची आतषबाजी झाली. सदर परीक्षेत ती मुलींमध्ये ती पहिली आली असून महाराष्ट्रातुन ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. या करिता स्वराज्य प्रतिष्ठान लांजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि एनआरपी ग्रुप मुंबईचे अध्यक्ष नितीश ऋषिणाथ पत्याने भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...