कोकण कट्टा दिनदर्शिका- २०२२चे प्रकाशन ; "डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. श्री. शैलेश मोहिते" यांच्या शुभहस्ते संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
कोकण कट्टा दिनदर्शिका- २०२२चे प्रकाशन डॉ. आर.एन. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता मा.डॉ. श्री. शैलेश मोहिते यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी कोकण कट्टाचे अनेकानेक उपक्रम ऐकून डॉ. शैलेश मोहिते साहेब प्रभावित झाले आणि त्यांनी कोकण कट्टाच्या या सेवाकार्याचे कौतुक करून स्वतः या उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. सूचित ठाकूर, डॉ. जितेन भावसार, डॉ. राजेश सुखदेवे, डॉ. वैशाली आयरे तसेच कर्मचारी बंधू सुनील आडेलकर, नित्यानंद मयेकर, महादेव कामेरकर, प्रशांत पोविलकर व अनेक मान्यवर वर्ग यांनी देखील कोकण कट्टा संस्थापक श्री. अजितदादा पितळे व कोकण कट्टाच्या संपूर्ण परिवारापैकी सर्वश्री दादा गावडे, सुजीत कदम, विवेक वैद्य, दया मांडवकर, योगेश साटम, मनोज शेलार, हर्षल धराधर यांचे कौतुक करून अभिनंदन करतानाच आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ही अहवालरूपी दिनदर्शिका पाहून सेवाव्रत अंगीकारलेल्या कोकण कट्टा संस्थेबद्दल डॉक्टर मोहिते यांच्यासहित विविध स्तुत्य उपक्रमांना आपलीही नित्य साथ राहील असे आश्वासनही दिले गेले. अनाथ मुलांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी मी एक डॉक्टरांची टीम कोकण कट्टाला देऊ शकतो असेही डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. समाजातील अशा स्वतःहून पुढे येणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्यामुळेच कोकण कट्टा वाटचाल करीत आहे असे सांगून संस्थापक श्री. अजित दादा पितळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment